मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याला काही दिवस बाकी आहेत. बेन स्टोक्सच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड संघ अपयशी ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. या सामन्याआधी इंग्लंड संघाचा दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसन याने टीम इंडियाच्या एका खेळाडूला पाहत मी गोलंदाजीमध्ये बदल केले असल्याचं म्हटलं आहे. कोण आहे तो खेळाडू ज्याबद्दल अँडरसन मोकळ्या मनाने बोलला आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी झहीर खान आहे. जेम्स अँडरसन याने, आपण टीम इंडियाचा माजी खेळाडू झहीर खान याच्याकडून खूप काही शिकलो आहे. बॉल रिव्हर्स स्विंग करायचा हे शिकण्यासाठी मी अनेवेळा त्याची बॉलिंग पाहिली. रनअप घेताना हातातील चेंडू ज्या प्रकारे लपवायचा तशा प्रकारे मी माझ्या गोलंदाजीमध्ये अनेकदा प्रयत्न करत असल्याचं अँडरसन याने सांगितलं.
जेम्स अँडरसन याने झहीर खानबाबत बोलल्यावर जसप्रीत बुमराह याचंही कौतुक केलं. बुमराह खूप वेगवान गोलंदाजी करतो. त्याची अचूक गोलंदाजी खेळणे हे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे काम नसल्याचं अँडरसन याने म्हटलं आहे.
जेम्स अँडरसन याने 2003 साली पदार्पण केलं होतं, तेव्हापासून अँडरसन हा इंग्लंडच्या संघाचा भाग आहे. आता तो 41 वर्षांचा असून अजुनही त्याच ताकदीने तो मैदानात बॉलिंग करताना दिसतो. आता सुरू असलेल्या मालिकेमध्ये अँडरसन दोन विकेट घेताच कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे.
बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, रेहान अहमद, गस ऍटकिन्सन*, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर*, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स (wk), टॉम हार्टले*, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट , मार्क वुड