मुंबई : आशिया कप 2023 मधील भारत वि. नेपाळमधील सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नाही. बुमराहला आज पुत्रप्राप्ती झाली असल्याने तो घरी मायदेशी परतला आहे. बुमराहच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. गेल्या 11 वर्षांनंतर कमबॅक करणारा बुमराह अचानक गेल्याने चाहतेही चिंतेत पडले होते. आज सकाळीच बुमराहने सर्वांना आनंदाची बातमी दिली होती. बुमराहने आपल्या मुलाचं नावही आज सर्वांना सांगितलं.
जसप्रीत बुमराह याच्या मुलाचं नाव अंगद असं आहे. बुमराहने सकाळी ट्विट करत माहिती दिली होती. अंगद टीम इंडियाचा बॉलर मोहम्मद शमीसाठी लकी ठरलाय. अंगदसाठी बुमराह घरी परतला आणि त्याच्या जागी संघात मोहम्मद शमीला जागा मिळाली.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना पाकिस्तानच्या सामन्यात संधी मिळाली होती. याचा अर्थ वर्ल्ड कपसाठीसुद्धा विचार करताना टीम मॅनेजमेंट बुमराह-सिराज जोडीला प्राधान्य देईल. त्यामुळे शमीला आजच्या सामन्यात शमीला चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे. वर्ल्ड कपसाठी संघात आपली जागा आणखी पक्की करण्यासाठी त्याच्याकडे चांगली संधी आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी