मुंबई : आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. या संघात दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण भारतीय गोलंदाजीला जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे धार मिळणार आहे. जसप्रीत बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर होता. उपचारानंतर एनसीएमध्ये तयारी करत होता. पण वनडे वर्ल्डकपपूर्वी फिट होईल की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर आयर्लंड दौऱ्यासाठी संघात निवड झाल्याने क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. इतकंच काय तर त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुराही सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराह पहिल्यांदा टी20 मध्ये भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवत आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराह याने कसोटी संघाचं नेतृत्व केलं आहे. जसप्रीत बुमराह दहा महिन्यानंतर संघात पुनरागमन करत करत आहे. जसप्रीत बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे सप्टेंबर 2022 पासून खेळत नाही. आयपीएल आण आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धेतही तो खेळला नव्हता. त्याची उणीव संघाला वारंवार जाणवली आहे. यंदाचा एकदिवसीय वर्ल्ड कप भारतातमध्ये होणार असल्याने त्याचं संघात असणं महत्त्वाचं आहे. बुमराह याने शेवटचा सामना सप्टेंबर 2022 मध्ये खेळला होता. आयपीएल स्पर्धेतही बुमराह खेळला नव्हता.
NEWS ?- @Jaspritbumrah93 to lead #TeamIndia for Ireland T20Is.
Team – Jasprit Bumrah (Capt), Ruturaj Gaikwad (vc), Yashasvi Jaiswal, Tilak Varma, Rinku Singh, Sanju Samson (wk), Jitesh Sharma (wk), Shivam Dube, W Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Prasidh Krishna, Arshdeep…
— BCCI (@BCCI) July 31, 2023
भारतीय संघ ऑयर्लंड दौऱ्यावर तीन टी20 सामने खेळणार आहे. पहिला सामना 18 ऑगस्टला, दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 23 ऑगस्टला असणार आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्या, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना आराम दिला गेला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली टी 20 विश्वचषक 2022 नंतर एकही टी 20 सामना खेळलेले नाहीत.
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार, आवेश खान.