मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. भारतीय चाहते त्याला पुन्हा मैदानात खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. आशिया कप, टी-20 वर्ल्ड आणि आयपीएल या मोठ्या स्पर्धांना बुमराहला मुकावं लागलं. याचा सर्वात जास्त फटका टीम इंडियाला बसला आहे. चातक पक्षासारखे त्याचे चाहते बुम बुमची वाट पाहत आहेत मात्र त्याच्या खेळण्याबाबत कोणातीही अपडेट समोर आलीन नव्हती. अशातच बुमराहने स्वत: एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
जसप्रीत बुमराहने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहेत. या व्हिडीओमध्ये, बुमराह गोलंदाजी करताना दिसत असून त्याने बीसीसीआयला टॅग केलं आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला इंग्रजी गाणं वाजत असून त्याचा मराठीमध्ये, सर्वांना सांगी मी घरी येत आहे, असा त्याचा अर्थ होतो. बुमराहने हा व्हिडीओ शेअर केल्यावर चाहते खुश झाले आहेत. त्यांनी बुमराहला जितकं लवकरात लवकर कमबॅक करता येईल तेवढं कर असं म्हटलं आहे.
काहींनी त्याला आणखी आराम कर पण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये तु संघामध्ये असायलाच हवा, असं म्हटलं आहे. जसप्रीत बुमराहने आपला शेवटचा सामना 2022 साली खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो त्रस्त झाला होता. शेवटी त्याने सर्जरी केली आणि रेस्ट घेतला होता, मात्र आता भारताचा वाघ परत एकदा माघारी परतण्यासाठी सज्ज झाला असल्याने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराहसोबत टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदात श्रेयस अय्यरही आता सराव करत असल्याचं समोर आलं आहे. यंदाच्या आशिया कपसाठी जरी बुमराह नाही खेळला मात्र वर्ल्डकपसाठी त्याने तयार असायला हवं.