वेगवान गोलंदाजीसाठी असं केलं की झालंच समजा! नीरज चोप्राचा जसप्रीत बुमराहला सल्ला

| Updated on: Dec 04, 2023 | 3:25 PM

जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाजीच्या ताफ्यातील महत्त्वाचा गोलंदाज आहे. संघात असला की टीम इंडियाच्या ताकदीत दुपटीने वाढ होते. धावसंख्या कमी असली तर प्रतिस्पर्धी संघाला तगडी झुंज देण्याची ताकद त्याच्यामुळे येते. दुखापतीतून सावरल्यानंतर जसप्रीत बुमराहाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. आता भालाफेकपटू नीरज चोप्राने जसप्रीत बुमराहला गोलंदाजीचा वेग वाढवण्यासाठी सल्ला दिला आहे.

वेगवान गोलंदाजीसाठी असं केलं की झालंच समजा! नीरज चोप्राचा जसप्रीत बुमराहला सल्ला
काय केलं पाहीजे की वेग वाढेल? नीरज चोप्राने जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी दिला कानमंत्र
Follow us on

मुंबई : दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. आशिया कप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीची धार दिसून आली आहे. जसप्रीत बुमराह याने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 20 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. तसेच त्याची आगळीवेगळी गोलंदाजीच्या शैलीमुळे फलंदाजांना त्याचा सामना करणं कठीण जातं. आता ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सल्ला दिला आहे. तो त्याच्या त्याच्या गोलंदाजीचा वेग आणखी वाढवू शकतो असं त्याने सांगितलं आहे. नीरज चोप्राने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याबाबत माहिती दिली. एक छोटासा बदल केल्यास त्याच्या गोलंदाजीचा वेग वाढवण्यास मदत होऊ शकते असं भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सांगितलं आहे.

काय म्हणाला नीरज चोप्रा?

“मला वाटतं गोलंदाजीचा वेग वाढवण्यासाठी त्याने आपला रन अप वाढवला पाहीजे. भालाफेकपटू म्हणून आम्ही कायम यावर चर्चा करत असतो. वेगवान गोलंदाजाने रन अप जास्त घेतला तर चेंडू वेगाने टाकू शकतो. मला बुमराहची गोलंदाजी खूपच आवडते.”, असं नीरज चोप्रा याने सांगितलं. पहिल्यांदाच मी एखादा सामना पूर्ण पाहीला. भारत ऑस्ट्रेलिया अंतिम सामना सुरु होता तेव्हा मी फ्लाइटमध्ये होतो. भारताने तीन विकेट गमावलेले.

“मी जेव्हा मैदानात पोहोचलो तेव्हा विराट आणि केएल राहुल फलंदाजी करत होतो. तांत्रिक बाबी मला कळत नाही. पण त्या दिवसी दिवसा फलंदाजी करणं खूपच कठीण दिसत होतं. त्या तुलनेत संध्याकाळी फलंदाजीला चांगला वाव होता. पण आपल्या संघाने पूर्ण प्रयत्न केला. कधी कधी आपला दिवस नसतो. पण ही स्पर्धा खरंच खूप छान होती.”, असं नीरज चोप्रा याने सांगितलं.

जसप्रीत बुमरानह 30 कसोटी सामने खेळला असून 128 विकेट घेतल्या आहेत. तर 89 वनडेत 149, 62 टी20 सामन्यात 74 गडी बाद केले आहेत. आता दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. वर्ल्डकप टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने कसोटी सामने महत्त्वाचे आहेत.