टी20 वर्ल्डकप विजयाचा जल्लोष मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. वर्किग डे असूनही चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. अंतिम सामना जिंकून पाच दिवस उलटले तरी जोश काही कमी झाला नव्हता. याची अनुभूती विजयी मिरवणुकीत दिसून आली. टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. या फॉर्मेटच्या शेवटच्या टप्प्यात मिळालेलं यश खरंच खूप महत्त्वाचं ठरलं. विराट कोहली संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत फेल गेला. मात्र अंतिम फेरीत केलेली कामगिरी सर्वांच्या लक्षात राहणारी आहे. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला 177 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते खूपच खूश आहेत. असं असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत बीसीसीआय सचिव जय शाह यांनाही विराट कोहलीच्या वर्ल्डकपमधील कामगिरीची भूरळ पडल्याचं दिसत आहे.
बीसीसीआयने चॅम्पियन टीमला 125 कोटी रुपये बक्षिस जाहीर केलं होतं. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी विजयी मिरवणूक निघाल्यानंतर गौरव समारंभ पार पडला. यावेळी सर्व खेळाडूंना धनादेश घेण्यासाठी मंचावर बोलवण्यात आलं. कर्णधार रोहित शर्माच्या पाठोपाठ टीम इंडियाचे एका पाठोपाठ एक स्टेजवर आले. उपकर्णधार हार्दिक पांड्यानंतर वरिष्ठ खेळाडू विराट कोहली स्टेजवर आला. बीसीसीआय आणि एमसीएचे सदस्य खेळाडूंचं हस्तांदोलन करत होते. पण बीसीसीआय सचिव जय शाह यांनी विराट कोहलीला हात मिळवल्यानंतर पुढचं सर्वकाही विसरून गेले. बुमराहशी हात मिळवणी करणंही विसरून गेले. त्यामुळे बुमराहने पहिल्यांदा बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना हात मिळवला .मात्र काही क्षणात जय शाह भानावर आले आणि त्यांनी बुमराहसह इतर खेळाडूंना हस्तांदोलन केलं.
Jay Shah is so me 🥹❤️😭
(The way he kept staring at Virat Kohli and forgot to shake hands 😂)#ViratKohli #IndianCricketTeam #T20WorldCupChampion #T20WorldCup #jayShah pic.twitter.com/HT6C4lFeKO
— Naina_H (@NH_hope13) July 4, 2024
विराट कोहलीची बॅट टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात बरोबर चालली आणि त्याचा फायदा टीम इंडियाला झाला. टी20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत विराट कोहलीने एकूण 7 सामन्यात 75 धावांची खेळी केली होती. मात्र ही कसर त्याने अंतिम सामन्यात भरून काढली. विराट कोहलीने 59 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.