IND vs ENG | जो रुटचा धमाका, दिग्ग्जांना मागे टाकत टीम इंडिया विरुद्ध कारनामा

| Updated on: Jan 27, 2024 | 8:06 PM

Joe Root India vs England 2nd Test | जो रुट याने टीम इंडिया विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर आता रुटने आणखी एक महारेकॉर्ड केला आहे.

IND vs ENG | जो रुटचा धमाका, दिग्ग्जांना मागे टाकत टीम इंडिया विरुद्ध कारनामा
Follow us on

हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. टीम इंडियाने पहिले 2 दिवस गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं. ओली पोप याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या दिवसापर्यंत 126 धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी टीम इंडियाने इंग्लंडच्या 246 धावांच्या प्रत्युत्तरात 436 धावा करत 190 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडने तिसऱ्या दिवसापर्यंत 6 विकेट्स गमावून 316 धावा केल्या.

इंग्लंडकडून ओली पोप 148 आणि रेहान अहमद 16 धावांवर नाबाद आहेत. बेन डकेट 47, बेन फोक्स 34, झॅक क्रॉली 31, जॉनी बॅरिस्टो 10 आणि कॅप्टन बेन स्टोक्स 6 याने धावा केल्या. तर टीम इंडियाला पहिल्या डावात ऑलआऊट करण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जो रुट अपयशी ठरला. जो रुट याने टीम इंडिया विरुद्ध बॉलिंग टाकताना पहिल्या डावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र रुट याला दुसऱ्या डावात बॅटिंग दरम्यान 2 धावाच करता आल्या. मात्र रुटने 2 धावांसह मोठा रेकॉर्ड केला.

जो रुट याने इतिहास रचला. जो रुट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिग याला मागे टाकत टीम इंडिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रुटने टीम इंडिया विरुद्ध आतापर्यंत 2 हजार 557 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 2 हजार 555 धावांसह रिंकी पॉन्टिंग आहेत. तर इंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कुक याच्या नावावर 2 हजार 431 धावा आहेत. दरम्यान काही तासाआंधी जो रुट याने सचिन तेंडुलकर याचा इंडिया-इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडीत काढला.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.