बंगळुरु | टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साखळी फेरीतील सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांनी खणखणीत शतकी खेळी केली. रोहित, शुबमन आणि विराट या तिघांनी अनुक्रमे 61, 51 आणि 51 अशा धावा केल्या. तर केएल राहुल याने 102 तर श्रेयस अय्यर याने 128 धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडिया वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. तर नेदरलँड्स वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे.त्यामुळे दोन्ही संघांसाठी औपचारिक सामना आहे. टीम इंडिया सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. त्याआधी कॅप्टन रोहितला आपल्याच टीममधील खेळाडूने दे धक्का दिला आहे.
केएल राहुल याने नेदरलँड्स विरुद्ध शतक केलं. केएलने 62 चेंडूंमध्ये हे शतक केलं. केएलच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे सातवं शतक ठरलं. केएलने टीम इंडियाकडून वर्ल्ड कपमध्ये वेगवान करण्याचा बहुमान मिळवला. तसेच केएलने रोहित शर्मा याचा वेगवान शतक करण्याचा विक्रम मोडला. केएलेने रोहितचा 63 बॉलमधील शतकाचा विक्रम मोडीत काढला.
रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध 63 चेंडूत शतक झळकावलं होतं. केएलने नेदरलँड्स विरुद्ध 11 चौकार आणि 4 सिक्ससह 102 धावांची खेळी केली. दरम्यान टीम इंडिया 15 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध पहिला सेमी फायनल सामना खेळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडाऊड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.