मुंबई : वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने 70 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयल अय्यर यांच्या शतकाच्या जोरावर 397 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करतावा किवींचा संघ 327 धावांवर ऑल आऊट झाला. मोहम्मद शमी याने एकट्याने सात विकेट घेत सामना फिरवला आणि भारतीय संघाचं फायनलचं तिकीट पक्क केलं. या सामन्यानंतर बोलताना न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने आपली प्रतिक्रिया दिली.
सर्वात प्रथम भारतीय संघाचं अभिनंदन, एकमद शानदार खेळ करत ते टॉपच्या संघासारखं साजेसं खेळले. शेवटपर्यंत आमच्या संघातील खेळाडू लढले याचा अभिमाना वाटतो. भारताच्या वर्ल्ड क्लास फलंदाजांनी कडक फलंदाजी केली, बॉल स्विंग होत असल्याने कठीण होतं तरीपण ते 400 पर्यंत पोहोचले. भारतात खेळल्याचा आम्हालाही आनंद आहे. रचिन रवींद्र आणि डॅरेल मिशेल हे स्पेशल आहेत त्यांनी उत्तम खेळ केल्याचं केन आपल्या खास शैलीत म्हणजेच स्माईल करत बोलला.
आजच्या सामन्यात विराट कोहली याने वन डे मधील 50 वं शतक करत मोठा विक्रम रचला. सचिन तेंडुलकर याच्या एक पाऊल तो पुढे गेला आहे. युवा खेळाडू श्रेयस अय्यर याने सलग दुसरं शतक करत महत्त्वाची कामगिरी केली. श्रेयसने अवघ्या 70 बॉलमध्ये 105 धावा करत 400 च्या दिशेने वाटचाल करून दिली.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (डब्ल्यू), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज