माउंट माउंगानुई | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड क्रिकेट टीम मजबूत स्थितीत आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केन विलियमसन याच्या शतकी खेळीच्या जोरावर 528 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. केन विलियमसनने या सामन्यातील पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही शतक ठोकलंय. केनने या शतकासह मोठा कारनामा केला आहे. केनने यानंतर आता विराट कोहलीनंतर आता इंग्लंडच्या जो रुट यालाही मागे टाकलं आहे.
क्रिकेट चाहत्यांना केन विलियमसनकडून दुसऱ्या डावात पहिल्या डावातील एक्शन रिप्ले पाहायला मिळाला. केनने दुसऱ्या डावात 125 धावांच्या मदतीने शतक झळकावलं. केनने या शतकी खेळीत 12 चौकार लगावले. केनने दुसऱ्या डावात 109 धावा केल्या. केनच्या कसोटी कारकीर्दीतील हे 31 वं शतक ठरलं. केन यासह कसोटीत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत जो रुट याच्या पुढे निघाला. रुटच्या नावावर 30 शतकं आहेत. तर पहिल्या डावातील शतकासह केनने विराटला मागे टाकलं. विराटच्या नावावर टेस्टमध्ये 29 शतकांची नोंद आहे.
दरम्यान केनने पहिल्या डावात 289 चेंडूत 118 धावांची खेळी केली. केनने या खेळीत 16 चौकार लगावले. केनच्या या शतकाच्या मदतीने न्यूझीलंडला पहिल्या डावात 511 धावांपर्यंत मजल मारता आली. या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव हा 162 धावांवर आटोपला. तर त्यानंतर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसापर्यंत 43 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 179 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या नावावर यासह 528 धावांची भक्कम आघाडी झाली आहे.
केनचा डबल दणका, दक्षिण आफ्रिके विरुद्ध दोन्ही डावात शतकं
Shifting gears! Kane Williamson making a hundred in each innings of a Test match for the first time. Williamson’s first century in the match came off 241 balls while he reached his second in 125 balls. Scorecard | https://t.co/W6fz0aewis #NZvSA pic.twitter.com/0n469z9S1M
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 6, 2024
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टिम साउथी (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनव्हे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर, काइल जेमिसन आणि मॅट हेन्री.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | नील ब्रँड (कॅप्टन), एडवर्ड मूर, रेनार्ड व्हॅन टोंडर, झुबेर हमझा, डेव्हिड बेडिंगहॅम, कीगन पीटरसन, रुआन डी स्वार्ड, क्लाईड फॉर्च्युइन (विकेटकीपर), डुआन ऑलिव्हियर, त्शेपो मोरेकी आणि डेन पॅटरसन.