Kapil Dev : जसप्रीत बुमराहवर वेळ खर्च करणं म्हणजे बर्बादी, यॉर्कर किंगबाबत कपिल देव आक्रमक!

| Updated on: Jul 31, 2023 | 2:21 PM

Kapil Dev on Bumrah : जर बुमराह वेळेत दुखापतीमधून सावरला नाहीतर त्याच्यावर फोकस करणं म्हणजे वेळ बर्बाद करण्यासारखं असल्याचं म्हणत माजी खेळाडू कपिद देव यांनी निशाणा साधला आहे. त्यासोबतच आयपीएलबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे.

Kapil Dev : जसप्रीत बुमराहवर वेळ खर्च करणं म्हणजे बर्बादी, यॉर्कर किंगबाबत कपिल देव आक्रमक!
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारताचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे मैदानाच्या बाहेर आहेत. दुखीपतींच्या ग्रहनाचा टीम इंडियाला मोठा फटका बसत असलेला दिसत आहे. सध्या जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, के. एल. राहुलसारखे मोठे खेळाडू आता बाहेर उपचार घेतामा आपण पाहत आहोत. याच पार्श्वभुमीवर बोलताना भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांनी जसप्रीत बुमराह आणि आयपीएलवर खेळणाऱ्या खेळाडूंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले कपिल देव? 

जसप्रीत बुमराह गेल्या एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असून आता वर्ल्ड कप आला असतानाही तो परतला नाही. जर तो वेळेत दुखापतीमधून सावरला नाहीतर त्याच्यावर फोकस करणं म्हणजे वेळ बर्बाद करण्यासारखं आहे. बुमराहने मोठ्या आत्मविश्वासाने सकाव सुरू केला आहे मात्र तर सेमीफायनल किंवा फायनल सामन्यामध्ये खेळणार नसेल तर वेळ वाया घालवल्यासारखं असल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे.

मला कधी दुखापत झाली झाली असं नाही पण सध्या खेळाडू १० महिने खेळत आहेत. प्रत्येक खेळाडूने आपली काळजीस घेतली पाहिजे. आयपीएल चांगली स्पर्धा आहे मात्र आयपीएलमुळे तुमचं संपूर्ण करिअरही संपू शकतं. तुम्हाला जर किरकोळ दुखापत असेल आणि तरीसुद्धा तुम्ही खेळत असाल तर त्याचा तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो, असंही कपिल देव यांनी सांगितलं.

किरकोळ दुखापत असाताना तुम्ही आयपीएल खेळत असाल तर तुमच्यासाठीच ते चांगलं नाही. क्रिकेट बोर्डानेस लक्षात घ्यायला हवं की त्यांनी किती प्रमाणात क्रिकेट खेळलं पाहिजेत. आज तुमच्याकडे पैसा आहे पण जर कॅलेंडर नसेल तर बोर्डामध्ये काहीतरी गडबड असल्याचं समोर येत, असं म्हणत कपिल देव यांनी बोर्डावरही निशाणा साधला.

जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२ पासून संघाबाहेर गेला आहे. आयपीएल आण आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धांनाही त्याला मुकावं लागलं होतं. यंदाचा एकदिवसीय वर्ल्ड कप भारतातमध्ये होणार असल्याने त्याचं संघात असणं महत्त्वाचं आहे. बुमराहने आपण सरावाला सुरूवात केल्याचा व्हिडीओ शेअर केला होता.