पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचं भारतात आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील महिला संघाचा पहिला सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होता. महिला संघाने कौशल्य दाखवत दक्षिण कोरियाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाला कमबॅक करण्याची कोणतीच संधी दिली नाही. भारताने दक्षिण कोरियावर 175-18 गुणांच्या फरकाने विजय मिळवला. हा सामना भारताने 157 गुणांनी जिंकला. इतक्या मोठ्या फरकाने जिंकत भारताने इतिहास रचला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत या रेकॉर्डची नोंद होणार आहे. भारताने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताच्या खात्यात दोन गुणांची कमाई झाली आहे. पण भारताचा स्कोअर फरक 157 चा असल्याने जबर फायदा झाला. प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात झेंडा रोवला.
कर्णधार प्रियांका इंगळे हिने नाणेफेक जिंकून प्रथम बचाव करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच डावाच 2 2 ड्रिम गुण मिळवत. दक्षिण कोरियाला 10 धावांवर रोखले.दुसऱ्या डावाच्या 7 मिनिटांत 92 गुण मिळवले. या कालावधीत टीम इंडियाने 3 खेळाडूंच्या एकूण 15 बॅचला बाहेर काढले. तिसऱ्या डावातही दक्षिण कोरियाला वरचढ होऊ दिले नाही आणि त्यांना केवळ 8 गुणांवर रोखले. चौथ्या डावात अप्रतिम लय कायम ठेवत आक्रमण करत 78 गुण मिळवले. दुसरीकडे इराणने मलेशियाला 51-16 ने पराभूत केलं आहे. भारताचा पुढचा सामना हा इराणशी होणार आहे. बुधवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना होणार आहे.
प्रियांका इंगळेच्या टीम इंडियाला हा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करायचे आहे. भारतीय महिला संघ अ गटात आहे. भारताशिवाय या गटात दक्षिण कोरिया, मलेशिया आणि इराणचा समावेश आहे. या गटातून अव्वल स्थानी असलेले दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.
भारतीय महिला संघ: प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनू, मोनिका, नाझिया बीबी