कोलकाता | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 23 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होत. या डबल हेडलमधील पहिला आणि मोसमातील 32 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने 7 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन कोलकातामधील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं होतं. चेन्नईने या सामन्यात केकेआरवर 49 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने केकेआरला विजयासाठी 236 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र केकेआरला 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 186 धावाच करता आल्या.
चेन्नईने सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने केकेआरला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र केकेआरला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 186 धावाच करता आल्या. चेन्नईचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला.
कोलकाताने आठवी विकेट गमावलीय. उमेश यादव 4 धावांवर आऊट झाला.
कोलकाता नाईट रायडर्सने सातवी विकेट गमावली आहे. डेव्हिड विसे आऊट झाला आहे.
जेसन रॉय अर्धशतक ठोकल्यानंतर आऊट झालाय. जेसनने 26 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या.
जेसन रॉय याने चेन्नई विरुद्ध अर्धशतक ठोकलंय. जेसनने अवघ्या 19 बॉलमध्ये फिफ्टी पूर्ण केली. तसेच रिंकू सिंह आणि जेसन रॉय या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केलीय.
कोलकाताने चौथी विकेट गमावली आहे. कॅप्टन नितीश राणा याने 27 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा झटका लागला आहे. वेंकटेश अय्यर 20 धावा करुन माघारी परतला.
केकेआरने दुसरी विकेट गमावली आहे. सुनील नारायण याच्यानंतर एन जगदीशन आऊट झाला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सची निराशाजनक सुरुवात झाली आहे. केकेआरने 236 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये सुनील नारायण याची विकेट गमावली आहे. नारायण झिरोवर आऊट झाला आहे.
केकेआरच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईने केकेआरला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं आहे.
डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे या तिकडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 236 रन्सचं टार्गेट दिलं आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 235 धावा केल्या.
चेन्नईने चौथी विकेट गमावली आहे. रविंद्र जडेजा याने 18 धावा केल्या. धोनी बाद झाल्यानंतर सीएसके कॅप्टन महेंद्रसिंह धोनी मैदानात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने तिसरी विकेट गमावली आहे. वेगवान अर्धशतक ठोकल्यानंतर शिवम दुबे आऊट झालाय. दुबेने 21 बॉलमध्ये 5 गगनचुंबी सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा ठोकल्या. रहाणे आणि दुबे या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली.
अजिंक्य रहाणे याने चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलंय. रहाणेने अवघ्या 24 बॉलमध्ये 4 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं.
अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे या दोघांनी तिसऱ्या विकेट्ससाठी अवघ्या 16 चेंडूत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. चेन्नईसाठी ही सर्वात वेगवान अर्धशतकी भागीदारी ठरली आहे. याआधी महेंद्रसिंह धोनी आणि एस बद्रीनाथ या दोघांनी वेगवान अर्धशतकी भागीदारी केली होती.
चेन्नई सुपर किंग्सने दुसरी विकेट गमावली आहे. डेव्हॉन कॉनवे आऊट झाला आहे. कॉनवे याने 40 बॉलमध्ये 56 धावांची खेळी केली. कॉनवेचं हे या मोसमातील सलग चौथं अर्धशतक ठरलं.
चेन्नईा सलामी फलंदाज डेव्हॉन कॉनवे याने या मोसमात सलग चौथं अर्धशतक ठोकलंय. कॉनवेच्या या अर्धशतकामुळे चेन्नई चांगल्या स्थितीत पोहचली आहे.
केकेआरने चेन्नईची सेट झालेली सलामी जोडी फोडली आहे. सुयश शर्मा याने ऋतुराज गायकवाड याला बोल्ड करत केकेआरला ब्रेक थ्रू मिळवून दिला.
चेन्नई सुपर किंग्सची शानदार सुरुवात झाली आहे. सीएसकेच्या डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने पहिल्या 5 ओव्हरमध्ये नाबाद 45 धावा जोडल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही सलामी जोडी मैदानात आली आहे. केकेआरने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
चेन्नई प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षाना
केकेआर प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन नितीश राणा याने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 33 वा सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन कोलकातामधील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे.