पश्चिम बंगाल | आयपीएल 16 व्या मोसमात आज 20 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने होते. हा सामना कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात आला. लखनऊसाठी प्लेऑफसाठी हा विजय बंधनकारक होता. तर केकेआरला प्लेऑफमध्ये धडक देण्याची संधी होती. मात्र केकेआरचं समीकरण हे जर आणि तरवर होतं. दोन्ही संघांसाठी प्लेऑफ फेरीत एन्ट्री मिळवण्यासाठी विजय महत्वाचा होता. त्यामुळे सामन्यात चढाओढ पाहायला मिळाली. मात्र लखनऊने विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
लखनऊने केकेआरवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. लखनऊने केकेआरला विजयासाठी 177 धावाचं आव्हान दिलं होतं. मात्र केकेआरला 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 175 धावाच करता आल्या. रिंकू सिंह याने केकेआरसाठी शेवटच्या बॉलपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्याचे प्रयत्न अवघ्या 1 धावेसाठी अपुरे पडले. केकेआरच्या या पराभवासह त्यांचा आयपीएल 2023 मधील प्रवास इथेच संपला.
लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 1 धावांनी थरारक विजय मिळाला आहे. लखनऊने केकेआरला 177 धावांचं आव्हान दिलं होतं. रिंकू सिंह याने शेवटच्या काही ओव्हरमध्ये तोडफोड बॅटिंग करत केकेआरला शेवटच्या बॉलपर्यंत सामन्यात कायम ठेवलं. मात्र केकेआरला 1 बॉलमध्ये 8 धावांची गरज असताना रिंकूने सिक्स ठोकला. त्यामुळे लखनऊचा 1 धावेने विजय मिळवला. या विजयासह लखनऊ प्लेऑफमध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली आहे. तर केकेआरचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
रिंकू सिंह याने यश ठाकूर याच्या बॉलिंगवर 20 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकला आहे. त्यामुळे आता केकेआरला 2 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे.
केकेआर विरुद्ध लखनऊ सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. केकेआरला विजयासाठी 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे.
रिंकू सिंह याने सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे. रिंकूने 27 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. रिंकून 19 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलवर सलग 3 चौकार ठोकले. मग 2 धावा घेत स्वत:कडे स्ट्राईक ठेवली. त्यानंतर पाचव्या बॉलवर सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. तर सहावा बॉल डॉट राहिला.
रिंकू सिंह याने सामन्यातील 19 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये नवीन उल हक याच्या बॉलिंगवर सलग 3 चौकार ठोकले आहेत. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
केकेआरने सातवी विकेट गमावली आहे. सुनील नारायण 1 धावेवर रनआऊट झाला आहे.
केकेआरने सहावी विकेट गमावली आहे. यश ठाकूरने शार्दुल ठाकूर याला 3 धावांवर आऊट केलं आहे.
रवि बिश्नोईने याने कोलकाताला पाचवी आणि मोठी विकेट मिळवून दिली आहे. रविने धोकादायक आंद्रे रसेल याला क्लिन बोल्ड केला आहे. रसेलने 9 बॉलमध्ये 7 धावा केल्या.
कोलकाता नाईट रायडर्सने चौथी विकेट गमावली आहे. रहमानुल्लाह गुरबाज 15 बॉलमध्ये 10 धावा करुन आऊट झाला.
केकेआरने मोठी विकेट गमावली आहे. जेसन रॉय हा सेट बॅट्समन 28 बॉलमध्ये 45 धावा करुन आऊट झाला. लखनऊचा कॅप्टन कृणाल पंड्या याने जेसनचा काटा काढला.
केकेआरने मोठी विकेट गमावली आहे. रवि बिश्नोईने केकेआर कॅप्टन नितीश राणा याला 8 धावांवर आऊट केलं. यासह लखनऊने सामन्यात कमबॅक केलंय.
कोलकाताने चांगली सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. वेंकटेश अय्यर 24 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे केकेआरची 5.5 ओव्हरमध्ये 61-1 अशी स्थिती झाली.
केकेआरच्या जेसन रॉय आणि वेंकटेश अय्यर या सलामी जोडीने 177 धावांच्या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे लखनऊ अडचणीत सापडली आहे.
केकेआरच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरकडून 177 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात वेंकटेश अय्यर आणि जेसन रॉय ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. लखनऊकडून निकोलस पूरन याने सर्वाधिक 58 धावांची अर्धशतकी खेळी.
निकोलस व्यतिरिक्त लखनऊच्या 3 फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र या तिकडीला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यात अपयश आलं. क्विंटन डी कॉक याने 28, प्रेरक मंकड याने 26 आणि आयुष बदोनी याने 25 धावांची खेळी केली.
कृष्णप्पा गौतम याने नाबाद 11 आणि नवीन उल हक याने नॉट आऊट 2 धावा केल्या. कॅप्टन कृणाल पंड्या 9 रन करुन आऊट झाला. करण शर्मा याने 3 धावांचं योगदान दिलं. रवि बिश्नोई 2 रन करुन तंबूत परतला. तर मार्क्स स्टोयनिस याला भोपळाही फोडता आला नाही.
कोलकाताकडून सुनील नारायण, शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्थी या जोडीने 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
शार्दुल ठाकूर याने केकेआरला कमबॅक करुन दिलं आहे. शार्दुलने धी निकलोस पूरन याला 58 धावावंर आऊट केलं. त्यानंतर रवि बिश्नोई याला 2 रन्सवर आऊट केलं. त्यामुळे लखनऊची 18.5 ओव्हरमध्ये 8 बाद 162 अशी स्थिती झाली आहे.
लखनऊने चांगल्या भागीदारीनंतर सहावी विकेट गमावली आहे. आयुष बदोनी 25 धावांवर आऊट झाला. बदोनी आणि निकोलस पूरन या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.
लखनऊला पाचवा धक्का लागला आहे. क्विंटन डी कॉक 27 बॉलमध्ये 28 धावा करुन आऊट झाला.
लखनऊ सुपर जायंट्सने मोठी विकेट गमावली आहे. कॅप्टन कृणाल पंड्या 8 बॉलमध्ये 9 धावा करुन कॅच आऊट झाला आहे. सुनील नारायण याने रिंकू सिंग याच्याहाती कृणालला कॅच आऊट केलं.
वैभव अरोरा याने घातक मार्कस स्टोयनिस याचा टप्प्यात कार्यक्रम केला आहे. वैभवने मार्क्सला ठरवून कॅच आऊट केलं आहे. मार्क्सला भोपाळाही फोडता आला नाही.
लखनऊने दुसरा विकेट गमावला आहे. प्रेरक मंकड 20 बॉलमध्ये 26 धावा केल्या.
लखनऊने पहिली विकेट गमवावली आहे. करण शर्मा 5 बॉलमध्ये 3 धावा करुन आऊट झाला आहे.
केकेआर विरुद्ध लखनऊ सामन्याला सुरुवात झाली आहे. लखनऊच्या बॅटिंगसाठी मैदानात आली आहे. क्विंटन डी कॉक आणि कर्ण शर्मा सलामी जोडी मैदानात खेळत आहे. केकेआरने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅर्णधार), जेसन रॉय, रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्क्स स्टॉयनिस, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, आयुष बदोनी, के गौथम, के शर्मा, रवि बिश्नोई, मोहसिन खान आणि नवीन-उल-हक.
लखनऊ आणि केकेआर ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि सातव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 13 सामने जिंकले आहेत. लखनऊने 7 सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे वाया गेल्याने लखनऊला एक पॉइंट मिळाला. त्यामुळे लखनऊच्या नावावर 15 पॉइंट्स आहेत. तर केकेआर 6 सामन्यात विजयी झाली आहे. तर 7 मॅचमध्ये पराभूत झाली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन नितीश राणा याने फिल्डिंगचा निर्णय घेत लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता केकेआरचे गोलंदाज आपल्या घरच्या मैदानात लखनऊला किती धावांपर्यंत रोखतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा या मोसमातील अखेरचा साखळी सामना आहे. कोलकाता साखळी फेरीतील अखेरचा सामना हा आपल्या घरच्या मैदानात म्हणजे इडन गार्डनमध्ये खेळणार आहे. केकेआरला प्लेऑफच्या आशा लखनऊच्या तुलनेत फार कमी आहेत. तर दुसऱ्या बाजूला लखनऊला प्लेऑफ क्वालिफाय होण्यासाठी केकेआर विरुद्धचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकायचा आहे.