आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विजेता ठरली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने महाअंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने या विजयासह ट्रॉफी जिंकली. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलं होतं. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत केकेआरने पहिल्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी ट्रॉफी उंचावली. केकेआरने या याधी 2012 आणि 2014 साली गौतम गंभीर याच्या नेतृत्वात ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तर सनरायजर्स हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.
सामन्यानंतर विजेता आणि उपविजेता कर्णधार श्रेयस अय्यर-पॅट कमिन्स या दोघांनी मान्यवरांसह फोटोशूट केलंय. पाहा फोटो
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू अशी ख्याती मिळवलेला केकेआरचा वेगवान गोलंदाज याने अंतिम सामन्यात 3 ओव्हरमध्ये 14 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. स्टार्कला त्याच्या या चिवट कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
मिचेल स्टार्क ‘मॅन ऑफ द मॅच’
Mitchell Starc becomes the first player to win more than 1 POTM award in knock-outs in an IPL season. 🫡 pic.twitter.com/lFKv6SwM3n
— Johns. (@CricCrazyJohns) May 26, 2024
केकेआरचा अष्टपैलू सुनील नरीन प्लेअर ऑफ द सीरिज या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. सुनीलने या हंगामात बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली. सुनीलने 15 सामन्यांमधील 14 डावांमध्ये 488 धावा केल्या. तर 17 विकेट्सही घेतल्या. त्यातच्या या कामगिरीची दखल घेत त्याला सन्मानित करण्यात आलं.
SUNIL NARINE – The MVP of IPL 2024.
Greatest of KKR…!!!!! pic.twitter.com/1IBdxl1qRk
— Johns. (@CricCrazyJohns) May 26, 2024
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात केकेआरच्या रमनदीप सिंह याने लखनऊच्या अर्शीन कुलकर्णी याचा उलट दिशेने धावत उलट कॅच घेतला होता. रमनदीप घेतलेला झेल हा कॅच ऑफ द सिजन ठरला आहे. अंतिम सामन्यानंतर रमनदीप सिंह याचा सन्मान करण्यात आला.
कॅच ऑफ द सिजन
The catch of the season. A catch for the history books 🤌 pic.twitter.com/U6Dwt6tBQq
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 26, 2024
बक्षिस वितरण समारंभात सर्वात शेवटी विजेता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याला बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी ट्रॉफी दिली. त्यानंतर केकेआरच्या खेळा़डूंनी एकच जल्लोष केला. जल्लोषाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
केकेआर, ट्रॉफी आणि जल्लोष
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦! 🏆
BCCI President Roger Binny and BCCI Honorary Secretary @JayShah present the #TATAIPL Trophy to Kolkata Knight Riders Captain Shreyas Iyer 👏👏 #Final | #TheFinalCall | @KKRiders | @ShreyasIyer15 pic.twitter.com/MhVfZ6dPxk
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
सनरायजर्स हैदराबादचा नितीश कुमार रेड्डी ‘एमर्जिंग प्लेअर ऑफ द ईयर’ या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
नितीश कुमार रेड्डी
Nitish Kumar Reddy won the Emerging Player of the year award.
– The future of India. 🇮🇳 pic.twitter.com/cSKeMGBsuG
— Johns. (@CricCrazyJohns) May 26, 2024
पंजाब किंग्सचा गोलंदाज हर्षल पटेल पर्प कॅप विजेता ठरला. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने हर्षलच्या वतीने पर्पल कॅप स्वीकार केली. हर्षलने या 17 व्या मोसमात एकूण आणि सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या.
हर्षल पटेल पर्पल कॅप विजेता
It’s Harshal Patel who receives the Purple Cap award! 🥳
A wonderful season with the ball bagging 2️⃣4️⃣ scalps from 1️⃣4️⃣ matches 🫡#TATAIPL | #Final | #TheFinalCall | @PunjabKingsIPL pic.twitter.com/hGvh6sXgQt
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
केकेआरच्या विजयानंतर बक्षिस वितरण समारंभ पार पडला. यावेळेस विराट कोहली याच्या वतीने कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने विराट कोहलीच्या वतीने ऑरेंज कॅप विजेता हा पुरस्कार स्वीकारला. बीसीसीआय खजिनदार आशिष शेलार यांनी श्रेयसला हा पुरस्कार सोपवला
श्रेयसकडून विराटच्यावतीने ऑरेंज कॅप पुरस्कारचा स्वीकार
Shreyas Iyer received the Orange Cap behalf of King Kohli. 🐐 pic.twitter.com/b9q7MsJT2i
— Johns. (@CricCrazyJohns) May 26, 2024
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआर या विजयासह आयपीएल 2024 ची चॅम्पियन ठरली आहे. केकेआरने 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात विजय मिळवला. केकेआरने याआधी 2012 साली चेन्नईतील चेपॉकमध्ये विजय मिळवला होता. केकेआरची यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. केकेआरच्या गोलंदाजांनी आधी हैदराबादला 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर केकेआरने 2 विकेट्स गमावून 10.3 ओव्हरमध्ये 114 धावांचं आव्हान पूर्ण केलं. केकेआरकडून वेंकटेश अय्यर याने सर्वाधिक नाबाद 52 धावांची खेळी केली. रहमानुल्लाह गुरुबाज याने 39 धावांचं योगदान दिलं. तर सुनील नरीन आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी 6 धावा केल्या.
केकेआरने दुसरी विकेट गमावली आहे. रहमानुल्लाह गुरुबाज 32 बॉलमध्ये 39 रन्स करुन आऊट झाला आहे.
कोलकाताने 114 धावांचा पाठलाग करताना पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 72 धावा केल्या आहेत. रहमानुल्ल्हा गुरुबाज आणइ वेंकटेश अय्यर या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी झाली आहे.
केकेआरने 114 धावांचा पाठलाग करताना पहिली विकेट गमावली आहे. पॅट कमिन्स याने हैदराबादला पहिली विकेट मिळवून दिली आहे. सुनील नरीन 6 धावांवर कॅच आऊट झाला आहे.
केकेआरच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरची सुनील नरीन-रहमानुल्लाह गुरुबाज ही सलामी जोडी मैदानात आली आहे. केकेआरला विजयासाठी 114 धावांचं आव्हान मिळालं आहे. हैदराबादने 18.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 113 धावा केल्या.
सनरायजर्स हैदराबाजने केकेआरला विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं आहे. हैदराबादचा डाव हा 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर आटोपला.
हैदराबादने आठवी विकेट गमावली आहे. हेन्रिक क्लासेन आऊट झाला आहे. हर्षित राणा याने हेन्रिक क्लासेन याला16 धावांवर बोल्ड केलं.
हैदराबादला सातवा झटका लागला आहे. अब्दुल समद 4 धावांवर कॅच आऊट झाला आहे.
कोलकाताच्या गोलंदाजांमसमोर हैदराबादच्या फलंदाजीची घसरगुंडी झाली आहे. हैदराबादने सहावी विकेट गमावली आहे. शाहबाज अहमद 8 धावा करुन आऊट झाला आहे. वरुण चक्रवर्थी याने शाहबाजची शिकार केली. त्यामुळे आता हैदराबादची 11.5 ओव्हरमध्ये 6 बाद 71 अशी बिकट स्थिती झाली आहे.
हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. हैदराबादने पाचवी विकेट गमावली आहे. एडन मारक्रम आंद्रे रसेलच्या बॉलिंगवर मिचेल स्टार्कच्या हाती 20 धावांवर कॅच आऊट झाला.
हैदराबादने चौथी विकेट गमावली आहे. नितीश रेड्डी आऊट झाला आहे. हर्षित राणा याने विकेटकीपर रहमानुल्लाह गुरुबाज याच्या हाती नितीशला 13 धावांवर कॅच आऊट केलं.
हैदराबाद पावरप्लेमध्ये फ्लॉप ठरली आहे. हैदराबादने पहिल्या 6 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 40 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि राहुल त्रिपाठी हे तिधे बाद झाले आहेत. तर एडन मारक्रम आणि नितीश रेड्डी ही जोडी आता मैदानात आहे.
हैदराबादने पावर प्लेमध्ये तिसरी विकेट गमावली आहे. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड याच्यानंतर आता राहुल त्रिपाठी आऊट झाला आहे. त्यामुळे हैदराबादची स्थितीत 4.2 ओव्हरनंतर 3 बाद 21 अशी स्थिती झाली आहे.
वैभव अरोरा याने कोलकाताला मोठी विकेट मिळवून देत हैदराबादला मोठा झटका दिला आहे. त्रिपाठीने हैदराबादच्या डावातील दुसऱ्या आणि आपल्या कोट्यातील पहिल्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर हेडला विकेटकीपर रहमानुल्लाह गुरबाज याच्या हाती कॅच आऊट केलं.
मिचेल स्टार्कने हैदराबादला पहिला झटका दिला आहे. मिचेल स्टार्कने हैदराबादचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याला क्लिन बोल्ड केलं. अभिषेकने 2 धावा केल्या.
कोलाकाता विरुद्ध हैदराबाद अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. एसआरएचकडून ट्रेव्हिस हेड आण अभिषेक शर्मा सलामी जोडी मैदानात आली आहे.
केकेआर विरुद्ध एसआरएच महामुकाबल्याआधी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात आले. यानंतर राष्ट्रगीत पार पडलं. त्यानंतर आता काही सेकंदांमध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.
सनरायजर्स हैदराबाद इम्पॅक्ट खेळाडू: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मारकंडे, अब्दुल समद आणि वॉशिंगटन सुंदर.
कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट खेळाडू: अनुकूल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.
सनरायजर्स हैदरबादने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध महाअंतिम सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. कॅप्टन पॅट कमिन्स याने बॅटिंगचा निर्णय घेत केकेआरला बॉलिंगसाठी भाग पाडलं आहे.
केकेआर विरुद्ध एसआरएच महाअंतिम सामन्याला अवघी काही मिनिटं बाकी आहेत. क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर दोन्ही संघांच्या खेळाडूंची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे.
महामुकाबल्याची चाहत्यांना प्रतिक्षा
𝗧𝗵𝗲 𝗙𝗶𝗻𝗮𝗹 𝗖𝗮𝗹𝗹 🔥
The clock is ticking towards history in the making 🥳⏳
Who will emerge victorious in the summit clash – 💜 or 🧡
⏰ 7:30 PM IST
💻 https://t.co/4n69KTTxCB
📱 Official IPL App #TATAIPL | #KKRvSRH | #Final | #TheFinalCall pic.twitter.com/IblEEugyR6— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्याआधी केकेआर विरुद्ध हैदराबाद यांच्यात एकूण 2 वेळा आमनासामना झाला. केकेआरने हैदराबादला साखळी फेरीत पराभूत केलं. त्यानंतर क्वालिफायर 1 सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली. आता क्रिकेट चाहत्यांना अंतिम सामन्याची प्रतिक्षा आहे.
कोलकाता विरुद्ध हैदराबाद यांच्यात आयपीएल ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. या सामन्याला आता मोजून काही तास बाकी आहे. या सामन्यानिमित्ताने केकेआर आणि हैदराबादचा या हंगामातील इथवरचा प्रवास कसा राहिला? जाणून घ्या खालील फोटोद्वारे.
केकेआर आणि एसआरएचचा इथवरचा प्रवास
🚗 Road to the #Final 🏆
Two incredible journeys 💜🧡
It's now time for one final destination to conquer ⏳#TATAIPL | #KKRvSRH | #TheFinalCall pic.twitter.com/dvMm7sWX4P
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2024
केकेआर विरुद्ध एसआरच यांच्यात आयपीएल 2024 मधील अंतिम सामन्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याबाबत जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : केकेआर विरुद्ध एसआरएच अंतिम सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात एकूण 27 वेळा आमनेसामने आले आहेत. या 27 पैकी सर्वाधिक सामन्यात केकेआरचा बोलबाला राहिला आहे. अर्थात केकेआर हैदराबादवर वरचढ राहिली आहे. कोलकाताने एकूण 18 वेळा विजय मिळवला आहे. तर हैदराबादला 9 सामन्यात केकेआरवर मात करता आला आहे. तर केकेआरने गेल्या 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एसआरचने 2 सामने खेळले आहेत.
केकेआर विरुद्ध एसआरएच यांच्यात आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामना हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला चेपॉक क्रिकेट स्टेडियम परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला पावसाची बॅटिंग
ITS RAINING IN CHEPAUK...!!!!
- KKR practice session has been affected. [RevSportz] pic.twitter.com/7ItkJVfSWz
— Johns. (@CricCrazyJohns) May 25, 2024
सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, उमरान मलिक आणि विजयकांत व्यासकांत.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, चेतन साकरिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि अल्लाह गझनफर.
केकेआर विरुद्ध एसआरएच अंतिम सामन्याआधी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पूर्वसंध्येला फोटोशूट पार पडलं. श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स या दोघांनी आयपीएल ट्रॉफीसोबत चौपाटी आणि रिक्षासह फोटोशूट केलं आहे. आयपीएलच्या एक्स खात्यावरुन हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
2 कॅप्टन आणि 1 ट्रॉफी, 24 तासात विजेता ठरणार
Two Captains. One Trophy 🏆
..And an eventful Chennai evening 🛺🏖️
All eyes on the #Final 😎#TATAIPL | #KKRvSRH | #TheFinalCall pic.twitter.com/5i0nfuWTGN
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2024
आयपीएल्या 17 व्या हंगामातील महाअंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे 26 मे रोजी होणार आहे. या सामन्याबाबत प्रत्येक अपडेट ही आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.