मुंबई : भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohali)वाईट काळ सुरूच आहे. सलग दुसऱ्या सामन्यात कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आरसीबीचा (RCB vs SRH) हा दिग्गज फलंदाज शून्यावर बाद झाला आहे. मार्को यानसेनने त्याला पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये एडन मार्करामकडे झेलबाद केलं. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विराट सलग दोन सामन्यांमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलौरचे 68 धावांवर ऑल आऊट झाले असून त्यांनी हैदराबादला फक्त 69 धावांचं लक्ष्य दिलंय. मात्र, आरसीबीने आजच्या सामन्यात आयपीएलच्या (IPL 2022) केलेल्या कामगिरीमुळे चाहते निराश झाले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले. मार्को यानसेनने पहिल्याच षटकात आरसीबीला तिहेरी धक्के दिले. यानसेनने षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांना बाद केले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर अनुज रावतलाही बाद केले.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यानसेनला गोलंदाजीसाठी बोलावले. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस पहिल्याच चेंडूवर यान्सेनने क्लीन बोल्ड झाला. डु प्लेसिसनंतर कोहली क्रीझवर आला. विल्यमसनने विराटसाठी मैदान बदलले. त्याने दुसऱ्या स्लिपमध्ये खेळाडूलाही बोलावले. दक्षिण आफ्रिकेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एडन मार्कराम दुसऱ्या स्लिपमध्ये राहिला. यानसेनने चेंडू पुढे सरकवला. चेंडू स्विंग होऊन बाहेर जात होता. कोहलीला स्वत:ला रोखता आले नाही आणि चेंडू बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि दुसऱ्या स्लिपमध्ये मार्करामकडे गेला. विराट अनेकवेळा अशा प्रकारे बाद झाला आहे. त्याचा खास मित्र म्हणवल्या जाणाऱ्या सनरायझर्सचा कर्णधार विल्यमसनने त्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला.
विराट कोहलीची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले. मार्को यानसेनने पहिल्याच षटकात आरसीबीला तिहेरी धक्के दिले. यानसेनने षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांना बाद केले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर अनुज रावतलाही बाद केले. सुयश प्रभुदेसाईने पंधरा धावा आणि एक चौकार मारुन तो आऊट झाला.
बंगळुरूचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही यावेळी अपयशी ठरला. सुचितच्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर कार्तिकला स्वीप करायचा होता पण चेंडू पूरनच्या हातात गेला. त्याने डावीकडे जाऊन दुसऱ्या प्रयत्नात चेंडू पकडला. अंपायरने बॉल वाईड दिला असला तरी विल्यमसनने रिव्ह्यूची मागणी केली आणि अल्ट्रा एजवर चेंडू बॅटला नव्हे तर कार्तिकच्या ग्लोव्हला आदळून कीपरकडे गेल्याचे दाखवण्यात आले. यासह कार्तिक शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.
इतर बातम्या
टाटा मोटर्सच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारची होतेय ‘रेकॉर्ड ब्रेक’ विक्री… मागणी वाढल्याने उत्पादनात वाढ
Navneet Ravi Rana | चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणात राणा दाम्पत्याला अटक
Video : दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले, मार्कोचे आरसीबीला तिहेरी धक्के, पाहा Highlights Video