IPL 2022, KKR vs DC, Live Streaming : आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना, कधी, कुठे पाहता येईल सामना?

| Updated on: Apr 28, 2022 | 3:21 PM

आज दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना असून दोन्ही संघाच्या कामगिरीकडे आज विशेष लक्ष असणार आहे.

IPL 2022, KKR vs DC, Live Streaming : आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  सामना, कधी, कुठे पाहता येईल सामना?
KKR vs DC
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील आजच्या 25 वा सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे.  दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. दरम्यान, या सामन्यात सात वाजता नाणेफेक करण्यात येणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ एकूण सात सामने खेळला असून त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवलाय तर चार सामन्यात संघ पराभूत झाला आहे. तर दुसरीकडे केकेआरनं आठ सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात त्यांना यश आलंय तर पाच सामन्यात संघाला अपयश आलंय. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना आज 28 एप्रिल (गुरुवारी) रोजी खेळवला जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना सायंकाली  7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.