IND vs ENG | धोकादायक बेन डकेट आऊट, इंग्लंडला मोठा झटका, टीम इंडियाचं कमबॅक

| Updated on: Feb 17, 2024 | 11:39 AM

India vs England 3rd Test | टीम इंडियाने इंग्लंडला तिसऱ्या दिवशी झटपट 2 झटके दिल्याने त्याचा दबाव हा बेन डकेटवर झाला. डकेटने फटकेबाजीच्या नादात आपली विकेट टाकली. इंग्लंडचा अशाप्रकारे अर्धा संघ तंबूत परतला.

IND vs ENG | धोकादायक बेन डकेट आऊट, इंग्लंडला मोठा झटका, टीम इंडियाचं कमबॅक
Follow us on

राजकोट | टीम इंडियाने इंग्लंडला तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी झटपट 2 झटके दिले. जसप्रीत बुमराहने जो रुट आणि त्यानंतर कुलदीप यादव याने जॉनी बेयरस्टो याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियाला 2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळाले. मात्र टीम इंडियाला बेन डकेट याची विकेट हवी होती. ती विकेटही कुलदीप यादवने मिळवून दिली. टीम इंडियाने डकेटला आऊट करत इंग्लंडवर पूर्णपणे पकड मिळवली आहे. इंग्लंडचा अशाप्रकारे अर्धा संघ तंबूत परतला आहे.

इंग्लंडला तिसऱ्या दिवशी झटपट 2 झटके लागले. जो रुट रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर स्लीपमध्ये कॅच आऊट झाला. तर जॉनी बेयरस्टो कुलदीप यादवच्या बॉलिंगवर झिरोवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. एका बाजूला झटपट 2 विकेट्स जाऊनही बेन डकेट आपल्याच आक्रमक पद्धतीने खेळत धावा करत होता. डकेटने 150 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे टीम इंडियालास डकेटची विकेट कोणत्याही स्थितीत हवी होती.

इंग्लंडच्या डावातील 51 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कुलदीपने डकेटला आऊट केलं. शुबमन गिलने डकेटचा कॅच घेतला. डकेटने 151 बॉलमध्ये 23 चौकार आणि 2 सिक्ससह 153 धावांची खेळी केली. आता टीम इंडिया इतर फलंदाजांनाही झटपट आऊट करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

पहिल्या सत्रात काय झालं?

दरम्यान तिसऱ्या दिवसातील पहिलं सत्र हे बरोबरीत राहिलं आहे. पहिल्या सत्रात एकूण 26 षटकांचा खेळ झाला. या 26 षटकांमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला 3 झटके दिले. बेन डकेट याच्याआधी जो रुट आणि त्यानंतर जॉनी बेयरस्टो आऊट झाले. तर इंग्लंडने 3.19 च्या रन रेटने 83 धावा केल्या.

लंचपर्यंत इंग्लंडच्या 290 धावा

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.