IPL 2022 LSG vs RCB Live Streaming: जाणून घ्या लखनौ विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

| Updated on: Apr 19, 2022 | 8:00 AM

बहिणीच्या निधनामुळे आरसीबीचा महत्त्वाचा गोलंदाज हर्षल पटेल काही सामने खेळू शकला नव्हता, मात्र त्याने शेवटच्या सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे मंगळवारच्या सामन्यात बँगलोरच्या संघात कोणताही बदल होणार नाही.

IPL 2022 LSG vs RCB Live Streaming: जाणून घ्या लखनौ विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
IPL 2022 LSG vs RCB Live Streaming
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) स्पर्धेत आतापर्यंत 30 सामने पार पडले आहेत. या 30 सामन्यानंतर गुणतालिकेत टॉप 4 मध्ये असलेल्या लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore IPL 2022) या दोन संघांमध्ये मंगळवारी, 19 एप्रिल रोजी अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. आयपीएल 2022 च्या 31 व्या सामन्यात हे दोन तगडे संघ आमनेसामने असतील. उभय संघांमधील हा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. लखनौचे केएल राहुल (KL Rahul), क्विंटन डी कॉक, दीपक हूडा, क्रुणाल पंड्या शानदार फॉर्ममध्ये आहेत तर बँगलोरचे फलंदाज दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद यांच्यासमोर भले-भले गोलंदाज निष्प्रभ ठरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सामन्यात लखनौने मुंबई इंडियन्सचा तर आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. दोन्ही संघांचे सहा सामन्यांत आठ गुण आहेत आणि दोघांनाहकी विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. या मोसमात दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ दाखवला आहे. लखनौसाठी हा आयपीएलचा पहिलाच हंगाम आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीचा संघदेखील चांगल्या फॉर्मात आहे.

बहिणीच्या निधनामुळे आरसीबीचा महत्त्वाचा गोलंदाज हर्षल पटेल काही सामने खेळू शकला नव्हता, मात्र त्याने शेवटच्या सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे मंगळवारच्या सामन्यात बँगलोरच्या संघात कोणताही बदल होणार नाही. तर दुसऱ्या बाजूला लखनौच्या संघात एक बदल पाहायला मिळू शकतो. मागील सामन्यात वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिरा चांगलाच महागात पडला होता. त्याने चार षटकात 48 धावा देत केवळ एक गडी बाद केला होता. त्यामुळे कर्णधार राहुल त्याच्या जागी दुसऱ्या एखाद्या गोलंदाजाला संधी देऊ शकतो. अँड्र्यू टाय त्याची जागा घेऊ शकतो.

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 19 एप्रिल (मंगळवार) रोजी खेळवला जाणार आहे.

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

इतर बातम्या

Umran Malik : इंग्रजांचे षटकार खेचून देणार हा गोलंदाज, उमरानच्या धडाकेबाज कामगिरीचं शशी थरूरांकडून कौतुक

IPL 2022, CSK vs GT, Purple Cap : गुजरातचा चेन्नईवर 3 गडी राखून विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

IPL 2022, CSK vs GT, Orange Cap : चेन्नईला धुळ चारत गुजरातने सामना जिंकला, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?