मुंबई : श्रीलंका संघाचा माजी आणि दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगा सर्वांनाच माहिती आहे. लसिथ मलिंगा आपल्या खास बॉलिंग शैलीमुळे क्रिकेट चाहत्यांसह इतरांच्याही लक्षात राहिला. त्यासोबतच मलिंगाची हेअर स्टाईलसुद्धा अनेकदा चर्चेचा विषय ठरली होती. अशातच लसिथ मलिंगाच्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने मिडल स्टम्प बोल्ड केलेला दिसत आहे.
लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये मुंबई इंडिअन्स संघाचा बॉलिंग कोच आहे. सध्या मेजर क्रिकेट लीगमध्ये एमआय न्यूयॉर्क संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी लसिथ मलिंगा याच्याकडे सोपवण्यात आली आहे. अशातच एमआय न्यूयॉर्कच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मलिंगाच्या मुलाचा व्हिडीओ शेअर केलाय.
When you’re a Malinga and you are on ? – Duvin Malinga has the ???? teacher. We’d know! ??#OneFamily #MINewYork #MajorLeagueCricket | @malinga_ninety9 pic.twitter.com/db6j6IzBHn
— MI New York (@MINYCricket) July 20, 2023
या व्हिडीओमध्ये लसिथ मलिंगाचा मुलगा अगदी त्याच्यासारख्याच अॅक्शनने गोलंदाजी करताना दिसला. इतकंच नाहीतर पठ्ठ्याने मिडल स्टम्पही उडवला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला असून ज्यूनिअर मलिंगा असं चाहते कमेंटमध्ये बोलत आहेत.
मलिंगा व्हिडीओमध्ये, नॅचरल अँक्शन असं त्याच्या मुलाला गोलंदाजीवर म्हणाला. त्याला चेंडू सरळ आणि वेगाने टाकावा लागेस असं केलं तर तो ही शैली शिकू शकत असल्याचं मलिंगाने म्हटलं आहे.
दरम्यान, लसिथ मलिंगाची आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहिली तर 30 कसोटी आणि 226 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामने त्याने खेळले आहेत. यामधील अनुक्रमे 101, 338 आणि 707 विकेट्स घेण्याचा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. 2009 मध्ये मलिंगाने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं, 2009 ते 2019 अशी 10 वर्षे तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. मुंबईकडूने त्याने 122 सामने खेळताना 107 विकेट्स घेतल्या आहेत.