मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये दुसरा एकदिवसीय सामना हा 99 धावांनी जिंकला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-0 ने जिंकली. त्याआधी टीम इंडियाने मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये कांगारुंवर 5 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने पहिल्या सामन्यातील विजयासह इतिहास रचला. टीम इंडिया या विजयासह आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 ठरली. यासह टीम इंडिया वनडे, टेस्ट आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमधील नंबर 1 टीम होण्याचा बहुमान मिळवला. आता या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे.
या एकिदिवसीय मालिकेनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला 2011 नंतर वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यात यंदाचा वर्ल्ड कप हा 12 वर्षांनंतर भारतात होतोय. त्यामुळे टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार समजली जात आहे. मात्र यातही टीम इंडियासाठी आता एक गूड न्यूज समोर आली आहे. टीम इंडियाच हा वर्ल्ड कप जिंकणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तर टीम इंडिया आपला पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला होणार आहे. या दरम्यान टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकेल असे संकेत आहेत. तुम्हालाही बाब समजली, तर तुम्हीही म्हणाल की टीम इंडियाच वर्ल्ड कप उंचावेल.
ऑस्ट्रेलियाने 2015 आणि इंग्लंडने 2019 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. या दोन्ही वर्ल्ड कपआधी दोन्ही संघ हे आयसीसी ओडीआय रँकिंमध्ये अव्वलस्थानी होते. त्यानुसार आता टीम इंडियाही एक नंबर झालीय. त्यात वर्ल्ड कप तोंडावर आहे. या योगायोगामुळेच टीम इंडियाच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत.
वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.