IND vs ENG | टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण जिंकणार मालिका? दिग्गजाची भविष्यवाणी

| Updated on: Feb 12, 2024 | 4:53 PM

India vs England Test Series | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक करत मालिकेत बरोबरी केली.

IND vs ENG | टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण जिंकणार मालिका? दिग्गजाची भविष्यवाणी
Follow us on

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यानंतर आता तिसरा सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआयने उर्वरित 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीममध्ये केएल राहुल आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा यांची एन्ट्री झाली आहे. मात्र या दोघांना खेळण्यासाठी आधी फिटनेस सिद्ध करावी लागेल.

दोन्ही संघांसाठी हा मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाची आहे. ही मालिका जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. मात्र टीम इंडियाला घरात पराभूत करणं इंग्लंडसाठी सोपं नसेल. ही मालिका कोण जिंकणार याबाबत माजी क्रिकेटर इयन चॅपेल यांनी भविष्यवाणी केली आहे. चॅपेल नक्की काय म्हणाले हे जाणून घेऊयात.

“बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील टीम ही जो रुट याच्या कॅप्टन्सीतील इंग्लंड टीमपेक्षा फार वेगळी आहे, जी टीम गेल्या वेळेस स्पिनसमोर ढेर झाली होती”, असं इयन चॅपेल यांनी म्हटलं. इंग्लंड 2021 साली भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा जो रुट हा इंग्लंडचा कर्णधार होता. इंग्लंडला तेव्हा पहिल्या सामना जिंकल्यानंतरही मालिका गमवावी लागली होती.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियात मजबूत आहे. त्यांच्याकडे रोहित शर्मा याच्यासारखा तगडा कॅप्टन आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या दोघांचं कमबॅक झाल्याने टीमची ताकद आणखी वाढली आहे. मात्र विराटचा उर्वरित मालिकेत न खेळण्याचा निर्णय हा टीम इंडियासाठी मोठा झटका आहे. निवड समिती श्रेयस अय्यर याला अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्व देणार नाही, अशी अपेक्षा आहे. तसेच निवड समिती विकेट्स घेण्याची क्षमता असलेल्या कुलदीप यादव याला अधिक महत्त्व देईल”, अशी आशा चॅपेल यांनी व्यक्त केली.

“टीम इंडिया-इंग्लंड कसोटी मालिका ज्या पद्धतीने सुरु आहे, तशीच अपेक्षित होती. दोन्ही प्रतिभावान संघांमध्ये 5 सामन्यांची झुंज”, असंही चॅपेल यांनी म्हटलं.

शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).

इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.