Cricketer Death | दिग्गज भारतीय खेळाडूचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

| Updated on: Aug 01, 2023 | 7:41 PM

Cricketer Death | क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज क्रिकेटरचं निधन झाल्याने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

Cricketer Death | दिग्गज भारतीय खेळाडूचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा
Follow us on

मुंबई | टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरिजनंतर टी 20 मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 1 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. या दरम्यान क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय दिग्गज क्रिकेटपटूचं निधन झालंय. त्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

सर्वात वयस्कर असलेले फर्स्ट क्लास क्रिकेटर रुस्तम सोराबजी कूपर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. रुस्तम कूपर यांना रुसी कूपर नावानेही ओळखलं जायचं. रुस्तम यांचं झोपेदरम्यान 100 व्या वर्षी निधन झालं. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ट्विट करत ही वाईट बातमी दिली आहे. कूपर यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वातील तारा निखळला आहे. तसेच क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

रुस्तम कूपर यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन

रुस्तम कूपर यांनी गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी 100 वा वाढदिवस साजरा केला होता. कूपर हे हयात असलेले सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते.

रुस्तम कूपर यांनी 22 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 52.39 च्या सरासरीने 1 हजार 205 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 3 शतक ठोकली आहेत. तसेच रुस्तम यांनी इंग्लंडमधील हॉर्नसे क्लबकडून 3 हंगामात खेळताना 1 हजारपेक्षा अधिक धावाही केल्या होत्या.