World Cup 2023 दरम्यान खेळाडूचा धमाका, 25 चेंडूत वादळी शतक, पाहा व्हीडिओ

| Updated on: Oct 07, 2023 | 9:23 PM

Century only 25 Balls | क्रिकेट विश्वात दररोज अनेक रेकॉर्ड होत असतात आणि ते ब्रेकही होत असतात. मात्र आता वर्ल्ड कप दरम्यान एका फलंदाजाने अवघ्या 25 बॉलमध्ये धमाकेदार शतक ठोकत क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

World Cup 2023 दरम्यान खेळाडूचा धमाका, 25 चेंडूत वादळी शतक, पाहा व्हीडिओ
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 3 सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलंय. तर चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला विजयासाठी विक्रमी 429 धावांचं आव्हान दिलंय. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 428 धावा केल्या. आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक, वन डेर डुसेन आणि एडन मारक्रम या त्रिकुटाने खणखणीत शतकं ठोकली. एडन मारक्रम याने 49 बॉलमध्ये वर्ल्ड कपमधील वेगवान शतक ठोकलं. या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

एका युवा फलंदाजाने वर्ल्ड कपदरम्यान अवघ्या 25 बॉलमध्ये शतक ठोकलंय. त्यामुळे या युवा खेळाडूचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. युरोपियन टी 10 लीग स्पर्धेत या खेळाडूने हा कारनामा केलाय. या टी 10 लीग स्पर्धेत 6 ऑक्टोबर रोजी हंगेरी विरुद्ध तुर्किये यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात हंगेरीच्या ल्यूस डू प्लॉय या फलंदाजाने 25 बॉलमध्ये सनसनाटी शतक ठोकलंय. तसेच एकूण 40 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 23 चौकारांच्या मदतीने 407.50 च्या तुफान स्ट्राईक रेटने नाबाद 163 धावांची खेळी केली.

ल्यूस डू प्लॉय याने केलेल्या या वादळी खेळीच्या जोरावर हंगेरीने 10 ओव्हरमध्ये 220 धावा केल्या. त्यामुळे तुर्किेयेला विजयासाठी 221 धावांचं आव्हान मिळालं. मात्र तुर्कियेला 10 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 89 धावाच करता आल्या. अशाप्रकारे हंगेरीने हा सामना 131 धावांनी जिंकला.

ल्यूस डू प्लॉय याचा तडाखा

ल्यूस डू प्लॉय हा दक्षिण आफ्रिका वंशाचा आहे. ल्यूस डू प्लॉय याने या वेगवान अर्धशतकासह ल्यूस डू प्लॉय याने वेगवान शतकाच्या बाबतीत ख्रिस गेल याला मागे टाकलं. ल्यूस डू प्लॉय याने केलेली ही खेळी टी 10 क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी ठरली.

तुर्किये प्लेईंग ईलेव्हन | गोखान अल्ता (कॅप्टन), मोहम्मद इलियास अताउल्ला, इशाक इलेक, सिहान अल्टुन, मेसीट ओझतुर्क, बटुहान साहिन, रोमियो नाथ (विकेटकीपर), अली तुर्कमेन, मुहम्मत बिसर, मुहम्मद तुर्कमेन आणि मुरत यिलमाझ.

हंगेरी प्लेईंग ईलेव्हन | विनोथ रवींद्रन (कर्णधार), ल्यूस डू प्लॉय, शेख रसिक, आश्रित दारापुरेड्डी, झिमस डू प्लॉय, माझ भाईजी (विकेटकीपर), अब्बास घनी, अभितेश प्रशार, दानयाल अकबर, कामरान वाहिद आणि अॅडम गॉल.