क्वेटा | लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील दुसरा सामना हा वर्ल्ड जायंट्स विरुद्ध इंडिया महाराजा यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात वर्ल्ड जायंट्सने पहिले बॅटिंग करताना 8 विकेटस् गमावून 20 ओव्हरमध्ये 166 धावा केल्या. या सामन्यात इंडिया महाराजा टीमच्या मोहम्मद कैफ याने हवेत उडी घेत शानदार कॅच घेतली. कैफने वर्ल्ड लेजेंड्सचा बॅट्समन आणि आयर्लंडचा माजी फलंदाज केव्हीन ओबार्यन याचा हवेत उडी घेत कॅच अफलातून कॅच घेतला. कैफने घेतलेल्या या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
वर्ल्ड लेजेंड्सला केव्हिन ओ ब्रायनच्या रुपात पाचवा झटका बसला. ब्रायनने 8 बॉलमध्ये 4 रन्स केल्या. सामन्यातील 16 वी ओव्हर हरभजन सिंह टाकायला आला. या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर ब्रायनने मोठा फटका मारला. ज्या दिशेने फटका मारला त्या आसपास कैफ होता. कैफने बॉलवर नजर ठेवत धावायला सुरुवात केली. बॉल जवळ येताच कॅफने हवेत उडी घेत सुंदर असा कॅच घेतला.
मोहम्मद कॅफ याने घेतलेला कॅच
— Cricbaaz (@cricbaaz21) March 11, 2023
दरम्यान वर्ल्ड जायंट्सने इंडिया महाराजाला 167 धावांचं दिलं आहे. वर्ल्ड जायंट्सकडून शेन वॉट्सन याने सर्वाधिक 55 धावा केल्या. कॅप्टन एरॉन फिंच याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. बेस्टने 13 धावांचं योगदान गिलं. या व्यतिरिक्त इंडिया महाराजाच्या गोलंदाजांनी वर्ल्ड जायंट्सच्या फलंदाजांना मैदानात टिकून दिलं नाही.
इंडिया महाराजाकडून हरभजन सिंह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. भज्जीने 2 ओव्हरमध्ये 13 धावा देत ही कामगिरी केली. तर मराठमोळ्या प्रणीण तांबे याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच इरफान पठाण याने 1 विकेट घेतली.
वर्ल्ड जायंट्स प्लेइंग इलेव्हन | आरोन फिंच (कॅप्टन), ख्रिस गेल, शेन वॉटसन, जॅक कॅलिस, रॉस टेलर, केविन ओ ब्रायन, मॉर्न व्हॅन विक (विकेटकीपर), टिनो बेस्ट, ब्रेट ली, मॉन्टी पानेसर आणि ख्रिस मपोफू
इंडिया महाराजा प्लेइंग इलेव्हन | गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), मुरली विजय, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, हरभजन सिंग, प्रज्ञान ओझा, अशोक दिंडा आणि प्रवीण तांबे.