दोहा | इंडिया महाराजा टीमचा सलग दुसऱ्या सामन्यातही पराभव झाला आहे. वर्ल्ड जायंट्सने शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात इंडिया महाराजावर 2 धावांनी मात केली आहे. इंडिया महाराजाला विजयासाठी 167 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र वर्ल्ड जायंट्सने इंडिया महाराजाला 164 धावाच करुन दिल्या. इंडिया महाराजाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 20 ओव्हरमध्ये या धावा केल्या. इंडिया महाराजाच्या या पराभवासह कॅप्टन गौतम गंभीर याची सलग दुसरी अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.
इंडिया महाराजाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांची गरज होती. शेवटची ओव्हर ब्रेट ली टाकायला आला. मोहम्मद कैफ आणि स्टुअर्ट बिन्नी मैदानात होते. पहिल्या बॉलवर कैफने सिंगल घेतली. दुसरा बॉल डॉट गेला. तिसऱ्या बॉलवर बिन्नी आऊट झाला. त्यानंतर इरफान पठाण मैदानात आला. चौथ्या बॉलवर इरफानने सिगंल घेतली. आता परत कैफने सिंगल घेतली. त्यामुळे शेवटच्या बॉलवर विजयासाठी 1 बॉलमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज होती. इरफानने जोरात शॉट मारला. चौकार जाणारच तितक्यात बाउंड्री लाईनवर फिल्डरने हाताने बॉल आत ढकलला आणि 2 धावा वाचवल्या. तेवढ्यात इथे धावून 2 धावा पूर्ण केल्या. मात्र तो फोर गेला असता तर सुपर ओव्हर झाली असती.
इंडिया महाराजाकडून गौतम गंभीर याने सर्वाधिक 68 धावा केल्या. रॉबिन उथप्पा याने 29 धावा जोडल्या. मोहम्मद कैफ याने 21 धावांचं योगदान दिलं. सुरेश रैना आणि मुरली विजय या दोघांनी 19 आणि 11 रन्स केल्या. तर युसूफ पठाण 7 आणि स्टुअर्ट बिन्नी 2 धावा करुन माघारी परतले. इरफान पठाण 3 धावांवर नाबाद राहिला.
वर्ल्ड जायंट्सकडून रिकार्डो पॉवेल याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ब्रेट ली, टीनो बेस्ट आणि ख्रिस ख्रिस मपोफू या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी वर्ल्ड जायंट्सने टॉस जिंकून 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 166 धावा केल्या. वर्ल्ड जायंट्सकडून शेन वॉट्सन याने सर्वाधिक 55 धावा केल्या. कॅप्टन एरॉन फिंच याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. बेस्टने 13 धावांचं योगदान गिलं. या व्यतिरिक्त इंडिया महाराजाच्या गोलंदाजांनी वर्ल्ड जायंट्सच्या फलंदाजांना मैदानात टिकून दिलं नाही.
इंडिया महाराजाकडून हरभजन सिंह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. भज्जीने 2 ओव्हरमध्ये 13 धावा देत ही कामगिरी केली. तर मराठमोळ्या प्रणीण तांबे याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच इरफान पठाण याने 1 विकेट घेतली.
वर्ल्ड जायंट्स प्लेइंग इलेव्हन | आरोन फिंच (कॅप्टन), ख्रिस गेल, शेन वॉटसन, जॅक कॅलिस, रॉस टेलर, केविन ओ ब्रायन, मॉर्न व्हॅन विक (विकेटकीपर), टिनो बेस्ट, ब्रेट ली, मॉन्टी पानेसर, रिकार्डो पॉवेल
आणि ख्रिस मपोफू
इंडिया महाराजा प्लेइंग इलेव्हन | गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), मुरली विजय, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, हरभजन सिंग, प्रज्ञान ओझा, अशोक दिंडा आणि प्रवीण तांबे.