LLC 2024 : इंडिया कॅपिटल्सने सुरेश रैनाच्या संघाला 1 रन्सने दिली मात, शेवटच्या षटकात झालं असं

| Updated on: Sep 21, 2024 | 8:26 PM

लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात तोयम हैदराबाद आणि इंडिया कॅपिटल्स हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सुरेश रैनाच्या संघाला फक्त एका धावेने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. काय झालं ते जाणून घ्या

LLC 2024 : इंडिया कॅपिटल्सने सुरेश रैनाच्या संघाला 1 रन्सने दिली मात, शेवटच्या षटकात झालं असं
Image Credit source: Twitter
Follow us on

लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेला हळूहळू रंगत चढू लागली आहे. दुसऱ्या सामन्यात या स्पर्धेचा थरार प्रेक्षकांना अनुभवता आला.तोयम हैदराबाद आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात अतितटीची लढत झाली. सुरेश रैनाच्या नेतृत्वातील तोयम हैदराबाद संघाला अवघ्या 1 रन्सने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इंडिया कॅपिटल्स या संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. इंडिया कॅपिटल्स संघाने 20 षटकात 6 गडी गमवून 185 धावा केल्या आणि विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं. तोयम हैदराबाद संघाने चांगली लढत दिली. पण 20 षटकात 7 गडी गमवून 184 धावा करता आल्या. फक्त एक धाव विजयासाठी कमी पडली. जॉर्ज वर्करची 52 धावांची खेळी व्यर्थ गेली. दुसरीकडे, कर्णधार सुरेश रैना काही खास करू शकला नाही. शेवटच्या षटकात नेमकं काय झाले जाणून घ्या

शेवटच्या षटकात तोयम हैदराबादला विजयासाठी 18 आणि सामना बरोबरीत सोडवण्यासाठी 17 धावांची गरज होती. इंडिया कॅपिटल्सने शेवटचं षटक ख्रिस म्फोपुकडे सोपवलं होतं. पहिल्या चेंडूवर स्ट्राईकला ट्रेगो होता आणि त्याने एक धाव घेत समुउल्लाह शिनवारीला स्ट्राईक दिली. तेव्हा म्फोपुने दोन चेंडू वाइड टाकले. त्यानंतर 5 चेंडूत 15 धावा अशी स्थिती आली. दुसऱ्या चेंडूवर शिनवारीला एक धाव घेता आली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ट्रेगोने दोन धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारला. दोन चेंडूत 6 धावा अशी स्थिती आली. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा दोन धावा घेतल्या. त्यामुळे एक चेंडूत 4 अशी स्थिती आली. पण शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेता आल्या. त्यामुळे एका धावेने सुरेश रैनाच्या संघाचा पराभव झाला. तीन धावा घेतल्या असत्या तर सामना ड्रॉ झाला असता.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

तोयम हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): जॉर्ज वर्कर, चॅडविक वॉल्टन (विकेटकीपर), सुरेश रैना (कर्णधार), रिक्की क्लार्क, गुरकीरत सिंग मान, पीटर ट्रेगो, स्टुअर्ट बिन्नी, इसुरु उडाना, समिउल्ला शिनवारी, बिपुल शर्मा, नुवान प्रदीप.

इंडिया कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): नमन ओझा (विकेटकीपर), ड्वेन स्मिथ, इयान बेल (कर्णधार), बेन डंक, ऍशले नर्स, भरत चिपली, कॉलिन डी ग्रँडहोम, इक्बाल अब्दुल्ला, धवल कुलकर्णी, राहुल शर्मा, ख्रिस म्फोपु