LLC 2024 : लीजेंड्स लीग स्पर्धेतील सहा संघ आणि खेळाडूंबाबत जाणून घ्या

| Updated on: Aug 29, 2024 | 10:39 PM

लीजेंड्स लीग 2024 स्पर्धा 20 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेपूर्वी लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. स्पर्धेच्या 21 दिवसाआधी संपूर्ण संघ फायनल झाले आहेत. या स्पर्धेत एकूण सहा संघ खेळणार असून या संघातील खेळाडू निश्चित झाले आहे.

LLC 2024 : लीजेंड्स लीग स्पर्धेतील सहा संघ आणि खेळाडूंबाबत जाणून घ्या
Image Credit source: Twitter
Follow us on

लीजेंड्स लीग 2024 स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं बिगुल वाजलं आहे.या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत.ही लीग श्रीनगर, जोधपूर आणि सूरत येथे होणार आहे. कधी नव्हे तर या लीगची खूपच चर्चा रंगली आहे. कारण दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यासाठी रस दाखवला आहे. लिलावात 200 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामुळे त्यातून चांगल्या खेळाडूंची निवड करताना फ्रेंचायझींची दमछाक झाली. काही दिग्गज खेळाडू या स्पर्धेत अनसोल्ड राहिले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ब्रेट ली आणि मार्टिन गप्टिल यांना खरेदीदार मिळाले नाहीत. दुसरीकडे श्रीलंकेच्या उसुरु उडानाला सर्वाधिक भाव मिळाला. लिलावात या 61 खेळाडूंना कोणीच भाव दिला नाही.

मणिपाल टायगर्स संघ

हरभजन सिंग, रॉबिन उथप्पा, थिसारा परेरा, शेल्डन कॉट्रेल, डॅन ख्रिस्टियन, अँजेलो परेरा, मनोज तिवारी, असाला गुणरत्ने, सोलोमन मिरे, अनुरीत सिंग, अबू नेचिम, अमित वर्मा, इम्रान खान, राहुल शुक्ला, अमितोज सिंग, प्रवीण गुप्ता, सौरभ तिवारी.

इंडिया कॅपिटल्स संघ

ऍशले नर्स, बेन डंक, ड्वेन स्मिथ, कॉलिन डी ओरंडहोम, नमन ओझा, धवल कुलकर्णी, ख्रिस मपोफू, फैज फझल, इक्बाल अब्दुल्ला, किर्क एडवर्ड्स, राहुल शर्मा, पंकज सिंग, ज्ञानेश्वर राव, भरत चिपली, परविंदर अवाना, पवन सुयाल, मुरली विजय, इयान बेल.

गुजरात टीम

ख्रिस गेल, लियाम प्लंकेट, मॉर्न व्हॅन विक, लेंडल सिमन्स, असोहर अफोहान, जेरोम टेलर, पारस खाडा, सीकुगे प्रसन्ना, कामाऊ लेव्हररॉक, सायब्रँड एनोएलब्रेक्ट, शॅनन गॅब्रिएल, समर क्वाद्री, मोहम्मद कैफ, श्रीशांत, शिखर धवन.

कोणार्क सूर्यास ओडिशा

इरफान पठाण, युसूफ पठाण, केविन ओ’ब्रायन, रॉस टेलर, विनय कुमार, रिचर्ड लेवी, दिलशान मुनावीरा, शाहबाज नदीम, फिडेल एडवर्ड्स, बेन लॉफलिन, राजेश बिश्नोई, प्रवीण तांबे, दिवेश पठानिया, केपी अप्पाण्णा, अंबाती रायुडू, नवीन स्टीवर.

साउदर्न सुपरस्टार्स

दिनेश कार्तिक, एल्टन चिगुम्बुरा, हॅमिल्टन मसाकादझा, पवन नेगी, जीवन मेंडिस, सुरंगा लकमल, श्रीवत्स गोस्वामी, हमीद हसन, नॅथन कुल्टर नाईल, चिराग गांधी, सुबोथ भाटी, रॉबिन बिस्ट, जेसल कारी, चतुरंगा डी सिल्वा, मोनू कुमार.

अर्बनरायझर्स हैदराबाद

सुरेश रैना (कर्णधार), गुरकीरत सिंग, आणि पीटर ट्रेगो, समिउल्ला शिनवारी, जॉर्ज वर्कर, इसुरु उडाना, रिक्की क्लार्क, स्टुअर्ट बिन्नी, जसकरण मल्होत्रा, चॅडविक वॉल्टन, बिपुल शर्मा, नुवान प्रदीप, योगेश नागर.