लोकसभा निवडणुकीसाठी युसूफ पठाण ममता बॅनर्जींकडून रिंगणात, इरफान पठाण म्हणाला…

| Updated on: Mar 10, 2024 | 5:46 PM

लोकसभा निवडणुकीआधी सर्वत्र जागावाटपाची चर्चा होताना दिसत आहे. कोणाचं तिकिट कापलं जाणार आणि कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशातचा युसूफ पठाण निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. यावर त्याचा भाऊ इरफान पठाण काय म्हणाला जाणून घ्या.

लोकसभा निवडणुकीसाठी युसूफ पठाण ममता बॅनर्जींकडून रिंगणात, इरफान पठाण म्हणाला...
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपासंदर्भात सर्वत्र बैठकांचं सत्र सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये 195 जागा निश्चित आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. तर काँग्रेसने आतापर्यंत 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशातच पश्चिम बंगालमधील लोकसभेसाठी्च्या उमेदवारांची यादी तृणमूल काँग्रेस पक्षान जाहीर केली. यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू युसूफ पठाण याचंही नाव आहे. युसूफ पठाण याने राजकारणामध्ये जाण्याच्या निर्णयावर त्याचा भाऊ इरफान पठाण याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला इरफान पठाण

तुझा संयम, दयाळूपणा, कोणतंही पद नसताना गरजूंना मदत करणं आणि लोकांची सेवा करत आला आहेस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की, तू एकदा राजकारणात पाऊल टाकलं की लोकांच्या रोजच्या आयुष्यात खरंच काहीतरी बदल घडवून आणशील, असं इरफान पठान याने म्हटलं आहे. इरफान याने याबाबत एक्सवर म्हणजेच ट्विट करत माहिती दिली आहे.

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाने आपली 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा माजी युसूफ पठाण याच्या नावाचा समावेश आहे. युसूफ पठाण हा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. बहरामपूर या मतदारसंघातून त्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

युसूफसोबत आणखी एक खेळाडूला तिकीट

टीम इंडियाचे माजी स्टार अष्टपैलू खेळाडू कीर्ती आझाद यांनाही तृणमूल काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं आहे. कीर्ती आझाद हे दुर्गापूर मतदार संघातून निवडणुक लढवणार आहेत. या मतदार संघात त्यांना कोणाचं चॅलेंज असणार काही माहिती नाही. कारण भाजप आणि काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला नाही. णार आहे. या ठिकाणी सध्या भाजपचे एस. एस. आहलूवालिया खासदार आहेत. भाजप आणि काँग्रेसने अजून आपला उमेदवार जाहीर केला नाही.