Babar Azam | मी बाबरवर खूप प्रेम करतो, मला लग्न करायचंय, रमीज राजा याच्याकडून कॉमेंट्री दरम्यान प्रपोज

| Updated on: Aug 09, 2023 | 9:15 PM

Ramiz Raza Wants Marry With Babar Azam | पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आजम याने रमीज राजावर अशी काय जादू केलीय की माजी क्रिकेटरला त्याच्यासोबत लग्न करायचंय?

Babar Azam | मी बाबरवर खूप प्रेम करतो, मला लग्न करायचंय, रमीज राजा याच्याकडून कॉमेंट्री दरम्यान प्रपोज
Follow us on

इस्लामाबाद | आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कप 2023 स्पर्धेच्या सलामी सामन्यातून पाकिस्तान नेपाळ विरुद्ध खेळणार आहे. आशिया कपला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम हा श्रीलंकेत जोरदार कामगिरी करतोय. श्रीलंकेत सध्या श्रीलंका प्रीमिअर लीग सुरु आहे. बाबरने 7 ऑगस्टला गाले टायटन्स विरुद्ध 59 बॉलमध्ये 104 धावांची धमाकेदार शतकी खेळी केली. बाबरने केलेल्या या खेळीचं कौतुक नेटकऱ्यांनी केलं. इतकंच नाही, तर माजी पीसीबी चेयरमन रमीज राजा बाबरच्या प्रेमात पडला. बाबरची ही खेळी इतकी आवडली की रमीज राजा याने ऑन एयर प्रपोज केलं.

रमीज राजा सध्या लंका प्रीमिअर लीगमध्ये कॉमेंट्री करत आहे. या स्पर्धेतील 10 वा सामना हा गाले टायटन्स विरुद्ध कोलंबो स्ट्रायकर्स यांच्या खेळवण्यात आला. बाबरने या सामन्यात तुफानी शतक ठोकलं. बाबरच्या या शतकाचं रमीज राजा याने तोंडभरून कौतुक केलं. “बाबर आझम क्लास बॅट्समन आहे. तो फार शांत स्वभावाचा आहे. मी त्याला खूप प्रेम करतो. त्याच्याशी लग्न करायचंय”, असं रमीज राजा म्हणाले. व्हायरल होणाऱ्या व्हीडिओत असे शब्द कानावर पडत आहेत.

हे सुद्धा वाचा

रमीज राजा याच्याकडून बाबर आजमला प्रपोज

 

रमीज राजा याने हे सर्व मस्करीत म्हटलंय. रमीज राजा बाबरचा मोठा चाहता आहे. रमीज राजा पीसीबी चेअयमन असताना बाबरच्या पाठीशी ठामपणे उभे होते.

सामन्याचा धावता आढावा

गाले टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. टीम सायफर्ट याने गाले टायटन्सकडून सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. तर शेवोन डेनियल याने 49 धावांचं योगदान दिलं. कोलंबोने 189 धावाचं आव्हान हे 1 बॉलआधी म्हणजेच 19.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

बाबर आझम याने कोलंबो स्ट्रायकर्सच्या विजयात मोठी भूमिका बजावली. बाबरने 8 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 104 धावा चोपल्या. बाबरचं टी 20 क्रिकेटमधील हे 10 वं शतक ठरलं. बाबर टी 20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल याच्यानंतर 10 शतकांचा टप्पा गाठणारा दुसराच फलंदाज ठरला.