लंका प्रीमियर लीग स्पर्धेत जाफना किंग्स विरुद्ध दंबुला सिक्सर्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात जाफना किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कुसल परेराचं वादळ या सामन्यात पाहायला मिळालं. दंबुला सिक्सर्सकडून खेळताना त्याने 52 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा केल्या. या शतकासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. परेरा लंका प्रीमियर लीगमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. कुसल परेराने शतकी खेळी करत बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला आहे. बाबर आझमने मागच्या पर्वात गॉलमध्ये 57 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता हा विक्रम परेराच्या नावावर झाला असून त्याने 7 चेंडूंआधीच शतकी खेळी केली. फलंदाजीला सुरुवातीला अडचण होत असताना कुसल परेराने जम बसवला आणि शतकाकडे कूच केली. कुसल परेराची सुरुवाची खेळी संथ राहिली. त्याने 31 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. तर उर्वरित 50 धावांसाठी फक्त 19 चेंडू घेतले. विशेष म्हणजे कुसल परेराला टी20 वर्ल्डकप संघातून डावलं होतं.
दरम्यान, कुसल परेराची ही शतकी खेळी व्यर्थ गेली. कारण जाफना किंग्सने हा सामना 4 गडी राखून जिंकला. कुसल परेराचं शतक अविष्का फर्नांडोच्या 80 धावांपुढे फिकं पडलं. त्याने 34 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. त्याला चरिथ असलंकाची साथ मिळाली. त्याने 36 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. जाफना किंगला शेवटच्या षटकात 4 धावांची आवश्यकता होती. अझमतुल्लाने पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. त्यानंतर 1 धाव घेत फबियन अलेनला स्ट्राईक दिली. त्याने तीन चेंडू निर्धाव घालवले आणि सामना 1 चेंडू 1 धाव असा आला. अखेऱ फबियन अलेनने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि विजय मिळवून दिला.
💯 WELCOME TO THE KUSAL SHOW 💯
Kusal Perera hits a stunning , dominating the field with his brilliant performance! 🏏🌟 What an innings! #LPL2024 pic.twitter.com/OU0EGKG8L2
— LPL – Lanka Premier League (@LPLT20) July 3, 2024
दंबुला सिक्सर्स (प्लेइंग इलेव्हन): दनुष्का गुनाथिलका, कुसल परेरा (विकेटकपर), नुवानिडू फर्नांडो, तौहिद हृदोय, मार्क चॅपमन, चामिंडू विक्रमसिंघे, मोहम्मद नबी (कर्णधार), निमेश विमुक्ती, अकिला धनंजया, नुवान तुषारा, मुस्तफिजुर रहमान.
जाफना किंग्स (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, रिली रोसोव, चरिथ असालंका (कर्णधार), अजमातुल्ला ओमरझाई, धनंजया डी सिल्वा, फॅबियन ऍलन, विजयकांत व्यासकांत, असिथा फर्नांडो, जेसन बेहेनडोर्फ