मुंबई : IPL 2023 मधील 30 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या लो स्कोअरिंग सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अचानक ट्विस्ट पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सने लखनऊला विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले होते. लखनऊन या आव्हानापर्यंत सहजपणे पोहचली होती. कॅप्टन केएल राहुल याच्या अर्धशतकामुळे लखनऊचा विजय जवळपास निश्चित झाला होता. मात्र सामन्याचा शेवटचा बॉल पडत नाही तोवर काहीही सांगता येत नाही, असं म्हणतात, हे वाक्य गुजरातच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा खरं ठरवून दाखवलं. लखनऊने जवळपास जिंकलेला सामना गुजरातने हिसकावून घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी या छोट्या धावांच्या आव्हानाचा शानदार पद्धतीने बचाव करत लखनऊवर 7 धावांनी विजय मिळवला.
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी सुपर गोलंदाजी करत शानदार पद्धतीने 136 धावांचा बचाव करत लखनऊ सुपर जायंट्सवर 7 धावांनी विजय मिळवला. गुजरातने लखनऊला विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी लखनऊच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावला. लखनऊने अखेरीस 3 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स गमावले. गुजरातने लखनऊला 20 ओव्हरमध्ये 128 धावांवरच रोखलं. अशा प्रकारने गुजरातने लखनऊवर 7 धावांनी सनसनाटी विजय मिळवला.
लखनऊ सुपर जायंट्सने निर्णायक क्षणी कॅप्टन केएल राहुल आणि मार्कस स्टोयनिस हे दोघेही आऊट झाले आहेत.
लखनऊला विजयासाठी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 17 धावांची गरज आहे. आयुष बदोनी आणि कॅप्टन केएल राहुल दोघे मैदानात आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सने तिसरी विकेट गमावली आहे. निकोलस पूरन 1 धावा करुन आऊट झाला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे लखनऊ विजयाच्या जवळ पोहचली आहे. मैदानात केएल राहुल आणि कृणाल पंड्या हे खेळत आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सने चांगल्या सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. कायले मेयर्स 24 धावा करुन आऊट झाला आहे.
गुजरात विरुद्ध 136 धावांचं पाठलाग करायला आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सची झोकात सुरुवात झाली आहे. कायले मेयर्स आणि कॅप्टन केएल राहुल या दोघांनी टीमला शानदार सुरुवात करुन दिली आहे. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे.
लखनऊच्या बॅटिंगला सुरुवात झालीय. लखनऊकडून कॅप्टन केएल राहुल आणि कायले मेयर्स ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. गुजरातने लखनऊला विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं आहे.
गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. गुजरातकडून कॅप्टन हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ऋद्धीमान साहा याने 37 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 47 धावा जोडल्या. त्याशिवाय इतर फलंदाजांना छाप सोडता आली नाही. शुबमन गिल शून्यावर आऊट झाला. अभिनव मनोहर 3 रन्स करुन बाद झाला. विजय शंकर याने 10 धावांचं योगदान दिलं.डेव्हिड मिलर याने 6 धावा केल्या. तर राहुल तेवतिया 2 धावांवर नाबाद राहिला. लखनऊकडून कृणाल पंड्या आणि मार्क्स स्टोयनिस या दोघांनी 2 विकेट्स घेतल्या. तर नवीन उल हक आणि अमित मिश्रा या दोघांननी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
LSG vs GT Live
नवीन उल हक याने विजय शंकर याला आऊट करत गुजरात संघाला चौथा झटका दिला आहे. 10 धावा करून शंकर परतला आहे. मैदानाता किलर मिलर उतरला आहे. दुसरीकडे पंड्याने एक बाजू लावून धरली असून नाबाद 34 धावांवर खेळत आहे.
LSG vs GT Live
अभिनव मनोहर याला मैदानात आला नाहीतर अमित मिश्रा याने आऊट केलं आहे. मिश्राच्या गोलंदाजीवरस अभिनव मनोहर 3 धावांवर आऊट झाला. नवीन उल हक याने एक जबरदस्त कॅच पकडला. गुजरातसाठी हा तिसरा धक्का असून मैदानात विजय शंकर आणि हार्दिक पंड्या उतरला आहे.
LSG vs GT Live
लखनऊ संघाची दुसरी विकेट गेली असून साहा 47 धावांवर असताना मोठा फटका मारण्याच्या नादात कॅट आऊट झाला आहे. कृणाल पंडया यानेच दुसरी विकेट घेतली आहे. दोन्ही सलामीवीरांना त्याने तंबूत पाठवलं आहे. अभिनव आता मैदानात उतरला आहे.
LSG vs GT Live
गुजरात संघाला दुसऱ्याच ओव्हरमध्ये 4 धावांवर पहिला धक्का बसला होता. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्या आणि साहाने सावधपणे गोलदांजास केली आहे. 8 ओव्हरमध्ये 1 बाद 51 धावा केल्या आहेत.
LSG vs GT Live
शुबमन गिल आज फार काही चमक दाखवू शकला नाही. कृणाल पंड्याने त्याला रवी बिश्नोईकडे झेल देण्यास भाग पाडलं. गुजरातला पहिला धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या मैदानात उतरला आहे.
LSG vs GT Live
गुजरात संघाने अल्झारी जोसेफच्या जागी नूर अहमदला संधी देण्यात आली आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (C), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा
लखनई सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, आवेश खान, रवी बिश्नोई
LSG vs GT Live Score :
गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.