तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात एलिमिनिटेर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईमधील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
हे दोन्ही संघ या हंगामात साखळी फेरीत आमनेसामने आले होते. लखनऊने त्या रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबईवर शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावांनी विजय मिळवला होता. लखनऊचा हा मुंबईवर तिसरा विजय होता. मुंबईला लखनऊ विरुद्ध अद्याप एकदाही विजय मिळवता आलेला नव्हता. मात्र मुंबईने या एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवत मागचा सर्व हिशोब चुकता केला आहे. मुंबई या विजयानंतर क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे.
मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबई आता क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबईने पहिले बॅटिंग करताना लखनऊला विजयसाठी 183 धावाचं आव्हान दिलं. मात्र पलटणची शानदार फिल्डिंग आणि आकाश मढवाल याच्या 5 विकेट्ससमोर लखनऊ 16.3 ओव्हरमध्ये 101 धावांवर ऑलआऊट झाली.
लखनऊने 15 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमावले आहेत. रवि बिश्नोई आऊट झाल्यानंतर दीपक हुड्डाही रनआऊट झाला आहे. त्यामुळे लखनऊची 15 ओव्हरमध्ये 9 बाद 100 अशी स्थिती झाली आहे.
पलटणने लखनऊला सातवा आणि रन आऊटने दुसरा झटका दिलाय. कृष्णप्पा गौतम चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला. रोहित शर्माने कडक थ्रो करत गौतमला स्ट्राईक एंडवर रनआऊट केला.
लखनऊला मोठा झटका लागलाय. दीपक हुड्डा आणि मार्कस स्टोयनिस यांच्यात मिसकम्युनिकेशमुळे लखनऊला मोठा झटका लागला. दुसरी धाव घेताना दोघे एकमेकांना धडकले. त्यामुळे स्टोनिसला स्ट्राईक एंडवर पोहचायला उशीर झाला. तेवढ्यात इशान किशनने स्टोयनिसला रनआऊट केलं. स्टोयनिसने 27 बॉलमध्ये 40 धावांची खेळी केली.
आकाश मढवाल याने लखनऊचा बाजार उठवलाय. मढवालने लखनऊला सलग 2 बॉलमध्ये 2 झटके दिलेत. मढवालने 10 व्या ओव्हरमध्ये पहिले 3 डॉट बॉल टाकले. त्यानंतर चौथ्या बॉलवर आयुष बदोनी याला आऊट केलं. त्यानंतर निकोलस पूरन याला शून्यावर आऊट केलं.
लखनऊ सुपर जायंट्सने तिसरी विकेट गमावली आहे.पीयूष चावला या अनुभवी फिरकी गोलंदाजाने कृणाल पंड्या याला 8 धावांवर टीम डेव्हिड याच्या हाती कॅच आऊट केलंय.
लखनऊने पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 54 धावा केल्या आहेत. कृणाल 2 आणि मार्क्स स्टोयनिस 28 धावांवर नाबाद खेळत आहेत.
मुंबईच्या नेहल वढेरा याने मार्कस स्टोयनिसला जीवनदान दिलंय. मार्कसने पाचव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारला. हा फटका नेहल वढेरापासून दूर होता. मात्र वढेरा कॅचसाठी बॉल्या दिशेने कॅचसाठी गेला. बॉल पडणार इतक्यात वढेराने डाईव्ह मारत कॅचसाठी प्रयत्न केला. मात्र वढेराला कॅच घेण्यात अपयश आलं. वढेराने स्टोयनिसला 5 धावांवर जीवनदान दिलं. आता मुंबईला ही चूक किती महागात पडणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
ख्रिस जॉर्डन याने लखनऊला सुपर जायंट्सच्या धोकादायक काईले मेयर्स याला आऊट करत मुंबईला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. जॉर्डन याने मेयर्सला 18 धावांवर आऊट केलं.
मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला पहिला झटका दिला आहे. आकाश मढवाल याने प्रेरक मंकड याला हृतिक शौकीन याच्या हाती 3 धावांवर कॅच आऊट केलं.
लखनऊ सुपर जायंट्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. लखनऊकडून कायले मेयर्स आणि प्रेरक मंकड ही सलामी जोडी मैदानात आली आहे. लखनऊसमोर विजयासाठी 183 धावांचं आव्हान आहे.
मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. मुंबईकडून ख्रिस जॉर्डन याचा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र कुणा एकालाही मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक 41 धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार यादव याने 33 धावांचं योगदान दिलं.
तिळक वर्मा याने 26 धावा जोडल्या. नेहल वढेरा याने अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत 23 धावांची खेळी केली. इशान किशन 15 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन रोहित शर्माने 11 धावा केल्या. टीम डेव्हिडने 13 धावा जोडल्या. ख्रिस जॉर्डन 4 धावा करुन आऊट झाला. हृतिक शौकीन शून्यावर नाबाद रहिला.
लखनऊकडून नवीन उल हक याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नवीनने एकाच ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन या दोघांना आऊट करत मुंबईला बॅकफुटवर ढकललं. तर नवीन व्यतिरिक्त यश ठाकूर या युवा गोलंदाजाने पुन्हा आपली छाप पाडली. यशने 3 विकेट्स घेतल्या. तर मोहसिन खानने 1 विकेट घेतली.
ख्रिस जॉर्डन 4 धावा करुन आऊट झाला आहे. मुंबईने सातवी विकेट गमावली आहे.
मुंबईला सहावा झटका लागला आहे. तिलक वर्माने 22 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली.
मुंबईला टीम डेव्हिड याच्या रुपात पाचवा झटका लागला आहे. डेव्हिडने 13 बॉलमध्ये 13 धावा केल्या.
नवीन उल हक याने मुंबईचा टप्प्यात कार्यक्रम केलाय. नवीनने 11 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सूर्यकुमार यादव याला 33 धावांवर कॅच आऊट केलं. त्यानंतर याच ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर कॅमरुन ग्रीन याच्या दांड्या गुल केल्या. त्यामुळे मुंबईची 11 ओव्हरमध्ये 4 बाद 105 अशी स्थिती झाली आहे.
मुंबईने तिसरी विकेट गमावली आहे. सूर्याने 20 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने 33 धावांची खेळी केली.
कॅमरुन ग्रीन याने पावरप्लेमधील सहाव्या ओव्हरमध्ये 3 चौकार, एक डबल आणि एक सिंगलच्या मदतीने 15 धावा केल्या. मुंबईने या सहाव्या ओव्हरमधून एकूण 16 धावा केल्या. मुंबईने अशाप्रकारे पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये एकूण 2 विकेट्स गमावून 62 धावा केल्या.
4⃣2⃣4⃣4⃣1⃣1⃣ – Bole toh तोडू over ??
MI: 62/2 (6)
Get all the updates on our MI LIVE Blog ? https://t.co/E4exvxEDrC#OneFamily #LSGvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) May 24, 2023
मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. इशान किशन मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. यश ठाकूर याने लखनऊला दुसरी विकेट मिळवून दिली. इशान 15 धावा करुन माघारी परतला. अशा प्रकारे मुंबईची सलामी जोडी माघारी परतली आहे.
मुंबईला वेगवान सुरुवातीनंतर पहिला आणि मोठा झटका लागला आहे. कॅप्टन रोहित शर्मा आऊट झाला आहे. नवीन उल हक याने रोहितला आयुष बदोनी याच्या हाती 11 धावांवर कॅच आऊट केलं.
रोहित शर्मा याने आपल्या खेळीची शानदार सुरुवात केली आहे. रोहितने तिसऱ्या ओव्हरमध्ये सिक्स ठोकून आपलं खातं उघडलं आहे. रोहितने कृणालच्या बॉलिंगवर हा सिक्स ठोकला.
मुंबई इंडियन्सने सामन्याची चौकाराने सुरुवात केली आहे. इशान किशनने लखनऊचा कॅप्टन कृणाल पंड्या याच्या बॉलिंगवर चौकार ठोकला. तर दुसऱ्याच बॉलवर एक धाव काढून रोहित शर्मा याला स्ट्राईक दिली आहे.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि मोहसीन खान.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.
मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल एलिमिनेटरमध्ये आमनेसामने आहेत. हा सामना जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध खेळेल. तर पराभूत होणाऱ्या टीमचं आव्हान इथेच संपेल. त्यामुळे दोन्ही संघात या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.