तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या एलिमिनेटर सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. पलटणने या आरपारच्या लढाईची सुरुवात विजयाने केली आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईची तगडी बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे मुंबई लखनऊला किती धावांचं आव्हान ठेवणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
हा सामना जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. तर पराभूत संघाचा प्रवास इथेच संपेल. त्यामुळे लखनऊ आणि मुंबई हे दोन्ही संघ जीव ओतून विजयसाठी प्रयत्न करणार आहेत.
मुंबईने या निर्णायक सामन्यासाठी एक पण मोठा बदल केला आहे. रोहित शर्मा याने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलाय. रोहितने कुमार कार्तिकेय याच्या जागी ऑफ स्पिनर ऋतिक शौकीन याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलाय. त्यामुळे आता रोहितचा हा निर्णय किती यशस्वी ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Rohit: "One change, Shokeen is in for Kartikeya."#OneFamily #LSGvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) May 24, 2023
लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यातील हेड टु हेड आकडेवारी ही पलटणसाठी फार चिंताजनक आहे. लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यात एकूण या 16 व्या मोसमात एकदा आणि त्याआधी 2022 मध्ये दोनवेळा आमनासामना झाला आहे. या एकूण 3 सामन्यात लखनऊने मुंबईला लोळवलंय. स्ट्राँग बॅटिंग लाईनअप असणाऱ्या मुंबई इंडियन्सची लखनऊ विरुद्ध मात्र बॅटली लो होते. मुंबईला अजूनतरी लखनऊवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबईसमोर लखनऊचं आव्हान आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि मोहसीन खान.