आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 48 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर केएल राहुलच्या नेतृत्वात विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी दिलेलं 145 धावांचं आव्हान हे 20 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. लखनऊचा हा या हंगामातील 6 वा विजय ठरला. मुंबईच्या या पराभवामुळे प्लेऑफचे दरवाजे बंद झालेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबईच्या फलंदाजांनी या सामन्यात सपशेल निराशा केली. त्याचा लखनऊने जोरदार फायदा घेत मुंबईला कमी धावांवर रोखण्यात यश मिळवलं. तर त्यानंतर हे आव्हान 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. लखनऊचा हा मुंबई विरुद्धचा चौथा विजय ठरला.