Gautam Gambhir | लखनऊच्या पराभवानंतर गौतम गंभीर याचा तो व्हीडिओ व्हायरल

| Updated on: Apr 16, 2023 | 12:24 AM

लखनऊ सुपर जायंट्सला पंजाब किंग्सकडून 2 विकेट्स पराभव स्वीकारावा लागला. लखनऊच्या या पराभवानंतर लखनऊ टीममधील महत्वाचा भाग असलेल्या गौतम गंभीर याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Gautam Gambhir | लखनऊच्या पराभवानंतर गौतम गंभीर याचा तो व्हीडिओ व्हायरल
Follow us on

लखनऊ | शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्स टीमने लखनऊ सुपर जायंट्सवर 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. लखनऊने पंजाबला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 19.3 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. सिकंदर रझा आणि शाहरुख खान ही जोडी पंजाबच्या विजयाची शिल्पकार ठरली. विजयी धावांसाठी मैदानात आलेल्या पंजाबने झटपट 2 विकेट्स गमावल्या. त्यानंतर लखनऊने पंजाबला ठराविक अंतराने झटके देणं सुरुच ठेवलं होतं. मात्र या दरम्यान मॅथ्यू शॉट याने 22 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. हरप्रीत भाटीया याने 22 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.

पंजाब अडचणीत असताना सिंकदर मैदानात घट्ट पाय रोवून उभा होता. राझाने निर्णायक क्षणी अर्घशतक ठोकलं. रझाचं हे आयपीएलमधील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं. तसेच रझा झिंबाब्वेकडून आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा पहिलाच फलंदाज ठरला. रझा याने 41 बॉलमध्ये 3 षटकार आणि 4 चौकार ठोकले. तर अखेरीस शाहरुखने 10 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने नाबाद 23 धावा केल्या. अशा प्रकारे पंजाबचा हा या मोसमातील तिसरा विजय ठरला.

आता कसं वाटतंय?

दरम्यान आपल्या टीमला घरच्या मैदानात पराभव झाल्यानंतर लखनऊ टीममधील कोचिंग स्टाफमधील गौतम गंभीर याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. नेटकऱ्यांनी गंभीरचा धीरगंभीर फोटो ट्विट करत त्याला डिवचलंय. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

लखनऊच्या पराभवानंतर गौतम गंभीर ट्रोल

लखनऊची बॅटिंग

दरम्यान त्याआधी पंजाबने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी बोलावलं. लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. लखनऊ सुपर जायंट्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. लखनऊला चांगली सुरुवात मिळाली. कॅप्टन केएल राहुल याने या मोसमातील पहिलंवहिलं खणखणीत अर्धशतक ठोकलं. मात्र अखेरीच ज्या फिनिशिंग टचची अपेक्षा होती, तसा टच इतर कोणत्याही फलंदाजाला देता आला नाही.

लखनऊकडून केएल राहुल याने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. कायले मेयर्स याने 29 धावा केल्या. कृणाल पंड्या याने 18 तर मार्कस स्टोयनिस याने 15 रन्स केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं.

पंजाब किंग्सकडून कॅप्टन सॅम कुरने याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कगिसो रबाडा याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हरप्रीत ब्ररार, अर्शदीप सिंह आणि सिकंदर रजा या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

लखनऊ प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड आणि रवि बिश्नोई.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | सॅम कुरेन (कर्णधार), अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.