लखनऊ | आयपीएल 16 व्या हंगामातील 43 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्याचं आयोजन हे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ इथे करण्यात आलं होतं. या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ होती. लखनऊने गेल्या सामन्यात आरसीबीचा शेवटच्या बॉलवर पराभव केला होता. तर या सामन्यात आरसीबीने लखनऊचा घरच्या मैदानात विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा घेतला.आरसीबीने हा सामना 18 रन्सने जिंकला. आरसीबीचा हा आयपीएल 16 व्या सिजनमधील 5 विजय ठरला. आरसीबीने या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली. आरसीबीने लखनऊसमोर 127 धावांचं विजयी आव्हान ठेवलं होतं. पण लखनऊला 19.5 ओव्हरमध्ये 108 धावाच करता आल्या. या दोन्ही संघांचा हा नववा सामना होता.
आरसीबीने लखनऊ सुपर जायंट्सवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. आरसीबीने लखनऊला विजयासाठी 127 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदारपणे बचाव करत 18 धावांनी विजय मिळवला. आरसीबीने लखनऊला 19.5 ओव्हरमध्ये 108 धावांवर ऑलआऊट केलं.
रवि बिश्नोई 5 धावा करुन रनआऊट झाला आहे. त्यामुळे लखनऊची 8 बाद 77 अशी स्थिती झाली आहे.
आरसीबीने सातवी विकेट गमावली आहे. कृष्णप्पा गौतम रनआऊट झाला आहे.
लखनऊने सहावी विकेट गमावली आहे. मार्क्स स्टोयनिस आऊट झाला आहे. त्याने 13 धावा केल्या.
लखनऊने पाचवी विकेट गमावली आहे. निकोलस पूरन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला.
लखनऊने लो स्कोअरिंग सामन्यात सुपर कमबॅक केलंय. लखनऊने दीपक हुड्डाच्या रुपात चौथी विकेट गमावली आहे.
आरसीबीच्या गोलंदाज लखनऊवर वरचढ झाले आहेत. लखनऊने एकापाठोपाठ एक 3 विकेट्स गमावले आहेत. कायले मेयर्स, कृणाल पंड्या याच्यानंतर आयुष बदोनी बाद झाला आहे.
मोहम्मद सिराजने लखनऊला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा झटका दिला आहे. सिराजने कायले मेयर्स याला भोपळाही फोडू दिला नाही. कायले मेयर्स झिरोवर कॅचआऊट झाला.
लखनऊच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कायले मेयर्स आणि आयुष बडोनी सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.
लखनऊने आरसीबीला स्वस्तात रोखलं आहे. लखनऊने आरसीबीला 20 ओव्हरमध्ये फक्त 126 धावाच करुन दिल्या. त्यामुळे लखनऊला विजयासाी 127 धावांचं आव्हान मिळालं आहे.
नवीन उल हक याने आरसीबाला 2 बॉलवर 2 झटके दिले. नवीनने कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज या दोघांना आऊट केलं.
गेल्या काही सामन्यांमध्ये सहकारी फलंदाजाला आऊट करणारा दिनेश कार्तिक लखनऊ विरुद्ध स्वत:च नॉन स्ट्राईक एंडवर रनआऊट झाला आहे. कार्तिकने 16 धावा केल्या.
आरसीबीने सहावि विकेट गमावली आहे. महिपाल लोमरुर 3 धावा करुन बाद झाला आहे.
आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसीस आऊट झाला आहे. फाफ 44 धावा करुन मैदानाबाहेर गेला.
पावसामुळे जवळपास 15 मिनिटांचा वेळ वाया गेला. त्यानंतर अखेर सामन्याला सुरुवात झाली आहे.
लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान पावसाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे.
अमित मिश्रा याने आरसीबीचा फलंदाज सुयश प्रभुदेसाई याला आऊट केला आहे. कृष्णप्पा गौतम याने सुयशचा अप्रतिम कॅच घेतला. यामुळे आता आरसीबीची 4 बाद 90 अशी स्थिती झाली आहे.
रवि बिश्नोई याने धोकादायक ग्लेन मॅक्सवेल याचा काटा काढला आहे. रविने ग्लेनला एलबीडबल्यू आऊट केलं.
आरसीबीने दुसरी विकेट गमावली आहे. विराट कोहली याच्यानंतर अनुज रावत बाद झाला आहे.
आरसीबीने पहिली विकेट गमावली आहे. रवि बिश्नोई याने विराट कोहली याला विकेटकीपरच्या हाती स्टंपिग आऊट केलं आहे. विराटने 30 बॉलमध्ये 31 धावांची खेळी केली.
आरसीबीला विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डु प्लेसिस या सलामी जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे.
लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगला सुरुवात केली आहे. कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात आली आहे.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला आहे. आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसिस याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. यामुळे आरसीबी लखनऊसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. कारण गेल्या सामन्यात आरसीबाला 200 पेक्षा अधिक धावा करुनही लखनऊकडून शेवटच्या चेंडूवर पराभव स्वीकारावा लागला होता.
लखनऊने आरसीबीचा गेल्या सामन्यात शेवटच्या बॉलवर 1 रन पूर्ण करुन विजय मिळवला होता. त्यामुळे आता आरसीबीचा या पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.