LSG vs RCB | आरसीबी विरुद्धच्या सामन्यातून लखनऊच्या मॅचविनर खेळाडूला डच्चू

| Updated on: May 01, 2023 | 8:02 PM

लखनऊ सुपर जायंट्स टीमने आरसीबी विरुद्ध झालेल्या गेल्या सामन्यात 1 विकेटने थरराक विजय मिळवला होता. त्या सामन्यातील मॅचविनर खेळाडूला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

LSG vs RCB | आरसीबी विरुद्धच्या सामन्यातून लखनऊच्या मॅचविनर खेळाडूला डच्चू
Follow us on

लखनऊ | आयपीएल 16 व्या हंगामातील 43 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्यातून आरसीबीचा फाफ डु प्लेसिस याने कॅप्टन म्हणून कमॅबक केलं. फाफने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. हे दोन्ही संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. लखनऊने गेल्या सामन्यात आरसीबीवर शेवटच्या बॉलवर 1 धाव काढून 1 विकेटने थरारक विजय मिळवला होता. त्या सामन्यात लखनऊला ऐन क्षणी विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूलाच आता आरसीबी विरुद्धच्या सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

आरसीबी विरुद्धच्या सामन्यातून आवेश खान याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. आवेशऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये कृष्णप्पा गौतम याला संधी देण्यात आली आहे. लखनऊ कॅप्टन केएल राहुल याने ही टॉसदरम्यान माहिती दिली.

आवेशची एकही धावा न करता निर्णायक भूमिका

आरसीबी विरुद्ध लखनऊ या मोसमात पहिल्यांदा 10 एप्रिल रोजी आमनेसामने आले होते. आरसीबीने या मॅचमध्ये लखनऊसमोर 213 धावांचे आव्हान ठेवले होते. लखनऊनेही चोख प्रत्युत्तर देत चांगली लढत दिली. लखनऊकडून विजयी धावांचं पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली. मात्र त्यानंतर मार्क्स स्टोयनिस आणि निकोलस पूरन या दोघांनी 65 आणि 62 धावांची अर्धशतकी खेळी करत लखनऊचं सामन्यातील आव्हान कायम ठेवलं. त्यानंतर आयुष बदोनी याने 30 धावा केल्या. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. या ओव्हरमध्येही थरार पाहायला मिळाला.

हे सुद्धा वाचा

सामना शेवटच्या बॉलपर्यंत पोहचला.लखनऊला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 1 धावेची आणि आरसीबीला 1 विकेटची गरज होती. मैदानात लखनऊकडून स्ट्राईकवर आवेश खान आणि नॉन स्ट्राईक एंडवर रवि बिश्नोई होता. तर हर्षल पटेल ओव्हर टाकत होता. सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा झाला होता, विशेष करुन विराट कोहली आणि गौतम गंभीर याच्यासाठी.

शेवटच्या बॉलचा थरार

हर्षल पटेल याने बॉल टाकला. आवेशकडून हा बॉल मिस झाला. मात्र त्यानंतरही तो नॉन स्ट्राईकच्या दिशने धावत सुटला. तर रवि बिश्नोई यानेही स्ट्राईक एंडच्या दिशेने धाव ठोकली. या दरम्यान आरसीबी विकेटकीपर दिनेश कार्तिक याच्याकडून बॉल पकडण्यात गडबड झाली आणि इथेच सर्व गडबड झाली. अशा प्रकारे लखनऊचा विजय झाला. आवेशने काढलेली धाव ही बाय स्वरुपात मिळावली. त्यामुळे ती धाव अतिरिक्त धावांमध्ये जोडण्यात आली. आवेशने या विजयाच्या भरात आपला हेल्मेट आपटला. त्यामुळे आवेशवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान आता आजच्या 1 मे च्या सामन्यात आवेश खान याचा 5 राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.