बंगळुरु | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 15 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या थरारक, बल्ड प्रेशर वाढवणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूवर 1 धावा काढत रॉयल चॅलेंजर्सवर 1 विकेटने विजय मिळवला. आरसीबीने लखनऊला 20 ओव्हरमध्ये 213 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनऊने हे आव्हान अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत 9 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आरसीबीला 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देऊनही पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आरसीबीच्या चाहत्यांची निराशा झाली. तर दुसऱ्या बाजूला लखनऊ सुपर जायंट्सचा कोचिंग स्टाफमधील गौतम गंभीर याचा विजयानंतर आनंद गगनात मावेनासा झाला होता.
विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांमधील असं घट्ट मैत्रीचं नातं आपल्या सर्वांना माहिती आहे. कधीकाळी हे दोघे आयपीएलमध्ये भिडले होते. आता गंभीर कोचिंग टीममध्ये आहे. तर विराट आयपीएल खेळतो. लखनऊने विजय मिळवला यापेक्षा विराटचा आणि त्याच्या टीमचा घरचा मैदानात पराभव केल्याचा आनंद गंभीर झाला असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. विराट विरुद्ध गंभीर या प्रतिष्ठेच्या लढाईत गंभीरने बाजी मारली. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं.
गौतम गंभीर याचं विजयी जल्लोष
Never dare to Show Ur attitude infront of our 2011 WC fighter @GautamGambhir ???
Same energy,Same Attitude?
Chokli @imVkohli ??#LSGvsRCB #IPL2023 #choker #Rcbfans #Karma @RCBTweets @LucknowIPL pic.twitter.com/xVrqOMjiz3— BaadShah_hudugru (@KICCHA_HITMAN45) April 10, 2023
शेवटच्या चेंडूवर लखनऊने 1 धाव काढल्यानंतर गंभीरचा विजयी जल्लोष पाहण्यासारखा होता. मैदानात असलेल्या आवेश खान आणि रवि बिश्नोई या शेवटच्या जोडीने 1 धाव पूर्ण करताच गंभीरने विजय साजरा केला. गंभीरचा उत्साह पाहण्यासारखा होता.
सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हस्तांदोलन करतात. ही गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा आहे. या दरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांसमोर आले. या दोघांकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. गंभीर आणि विराट या दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
गौतम गंभीर आणि विराट कोहली आमनेसामने
Loved to see Gautam Gambhir in full fledged form today ????
Silencing the whole chinnaswamy crowds after the win like a pro ???????? #RCBvsLSG pic.twitter.com/MdQIvUZCGN
— gαנαℓ (@Gajal_Dalmia) April 10, 2023
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.