मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants vs Chennai Super Kings) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे. चेन्नईचा कोलकाताने तर लखनौचा गुजरातकडून पराभव झाला आहे. आता दोन्ही संघांना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर या मोसमात पहिला विजय मिळवण्याची संधी आहे. दोन्ही संघांच्या (CSK vs LSG) पराभवाचे कारणही जवळपास सारखेच होते. दोन्ही संघांची आघाडीची फळी अपयशी ठरत होती आणि आता या संघांना या चुकीतून धडा घेऊन गुणतालिकेत खाते उघडायचे आहे. याशिवाय दोन्ही संघांना गोलंदाजीतही काही सुधारणा कराव्या लागणार आहेत.
आयपीएलचा सध्याचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे पण या सामन्यांमध्ये नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने कोणताही संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्यास प्राधान्य देतो. वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी केल्यानंतर चेन्नई आणि लखनौ या दोघांनाही सामने गमवावे लागले होते आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवरही परिस्थिती वेगळी नाही जिथे दव दुसऱ्या डावात मोठा फरक निर्माण करु शकते.
लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि स्टार सलामीवीर क्विंटन डी कॉक पहिल्या सामन्यात चालू शकले नाहीत आणि त्यांना या सामन्यात त्याची भरपाई करायची आहे. आयपीएलमध्ये राहुलच्या नेतृत्व कौशल्याचेही मूल्यमापन होत असल्याने राहुलने नेतृत्व करण्याची गरज आहे. मनीष पांडे आणि एव्हिन लुईस लवकर बाद झाल्यानंतर, दीपक हुडा, आयुष बडोनी आणि क्रुणाल पंड्या यांनी मधल्या फळीची जबाबदारी स्वीकारली, जे लखनौसाठी एक चांगले चित्र आहे. मात्र लखनौच्या गोलंदाजांना तात्काळ सुधारणा करावी लागेल, ज्यांचा गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी पराभव केला होता. वेगवान गोलंदाज दुष्मंत चमीराने प्रभाव पाडला पण आवेश खान चालू शकला नाही. याशिवाय रवी बिश्नोई, दीपक हुडा आणि क्रुणाल पंड्या या फिरकी त्रिकुटाचीही सामन्याचा निर्णय ठरवण्यात भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पहिल्या सामन्यात चेन्नईला केवळ 131 धावाच करता आल्याने त्यांना फलंदाजीत चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. मोईन अलीच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत झाला आहे. त्याच्याशिवाय ड्वेन प्रिटोरियसही निवडीसाठी उपलब्ध असेल. पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आपली जुनी झलक दाखवली पण ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डिव्हॉन कॉनवे आणि अंबाती रायुडू चांगले खेळले नाहीत. नवा कर्णधार रवींद्र जडेजाही मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, मोईनला कोणाच्या जागी खेळवलं जाणार आणि हे पाहणे मनोरंजक असेल. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या याआधीच्या सामन्यात अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने तीन विकेट घेतल्या होत्या पण इतर गोलंदाजांना सामन्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनाही एक युनिट म्हणून कामगिरी करावी लागेल.
दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत, त्यामुळे कोण कोणावर मात करेल याचा अंदाज लावता येत नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंकडे तगडा अनुभव आहे आणि ही गोष्ट त्यांच्या बाजूने जाऊ शकते. लखनौचा पराभव आणि विजय त्याच्या गोलंदाजांवर अवलंबून असणार आहे.
इतर बातम्या
Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड
RCB vs KKR IPL 2022 Match Prediction: RCB पराभवातून उसळी घेईल? आज श्रेयसच्या KKR शी भिडणार