Team India | 6 सिक्स-9 फोर, 15 बॉलमध्ये 90 धावा, इतक्या चेंडूत वादळी शतक, टीम इंडियाच्या बॅट्समनचा धमाका

| Updated on: Aug 25, 2023 | 6:12 PM

Cricket News | श्रेयस अय्यर याच्यानंतर आता टीम इंडियाच्या आणखी एका स्टार बॅट्समनने खणखणीत शतक ठोकलंय.

Team India | 6 सिक्स-9 फोर, 15 बॉलमध्ये 90 धावा, इतक्या चेंडूत वादळी शतक, टीम इंडियाच्या बॅट्समनचा धमाका
Follow us on

बंगळुरु | टीम इंडियाने आगामी आशिया कप 2023 स्पर्धेसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने सोमवारी 21 ऑगस्ट रोजी आशिया कप स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा हा टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडेच उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आलं आहे. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आशिया कपकडे रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे. आशिया कपच्या सर्व गडबडीदरम्यान बंगळुरुतून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या ओपनर बॅट्समनने विस्फोटक खेळी केली आहे. या खेळाडूने अवघ्या 15 बॉलमध्ये सामना फिरवला.

टीम इंडियाचा मयंक अग्रवाल हा गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मयंकला टीम इंडियात सातत्याने संधी मिळत नाहीयेत. मात्र या मयंकने बंगळुरुत सुरु असलेल्या महाराजा ट्रॉफीत आज धमाका केलाय. मयंक महाराजा ट्रॉफीत बंगळुरु ब्लास्टर्स टीमचं नेतृत्व करतोय. या स्पर्धेतील 25 वा सामना हा म्हैसूर वॉरियर्स विरुद्ध बंगळुरु ब्लास्टर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कॅप्टन मयंक अग्रवाल याने खणखणीत शतक ठोकलं.

मयंक अग्रवाल याचं खणखणीत शतक


मयंकने फक्त 57 बॉलमध्ये 105 धावांची शतकी खेळी केली. या शतकादरम्यान मयंकने 6 कडक सिक्स आणि 9 चाबूक चौकार ठोकले. याचाच अर्थ असा की मयंकने फक्त 15 बॉलमध्ये सिक्स आणि फोरच्या मदतीने खडेखडे 90 धावा केल्या. मयंकने सामन्याच्या दुसऱ्या डावात ही कामगिरी केली. मयंकने या शतकी खेळीच्या जोरावर पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं आहे.

म्हैसूर वॉरियर्स प्लेईंग इलेव्हन | करुण नायर (कर्णधार), रवीकुमार समर्थ, लंकेश केएस, शोएब मॅनेजर, शिवकुमार रक्षित (यष्टीरक्षक), मनोज भंडागे, जगदीशा सुचित, मुरलीधर व्यंकटेश, मोनीश रेड्डी, श्रीशा आचार आणि गौतम मिश्रा.

बंगळुरु ब्लास्टर्स प्लेईंग इलेव्हन | मयंक अग्रवाल (कॅप्टन), इजे जॅस्पर, देगा निश्चल, पवन देशपांडे, सूरज आहुजा (विकेटकीपर), शुभांग हेगडे, मोहसीन खान, सरफराज अश्रफ, गौरव, एलआर कुमार आणि अमन खान.