नवी दिल्ली | सोलापूरच्या अर्शीन कुलकर्णी याने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे. अर्शीनने या स्पर्धेत अमेरिके विरुद्ध खणखणीत शतक ठोकून आपली छाप सोडली होती. टीम इंडियाने उदय सहारन याच्या नेतृत्वात सलग 6 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र टीम इंडिया फायनलमध्ये पराभूत झाली आणि उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. मात्र यानंतर अर्शीनची धावांची भूक काही कमी झालेली नाही. अर्शीनने रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणात धमाका केलाय. अर्शीनने अर्धशतकी खेळी करत कारकीर्दीची तडाखेदार सुरुवात केलीय.
अर्शीनने महाराष्ट्रासाठी सर्व्हिस विरुद्ध पदार्पण केलं. अर्शीन पहिल्या डावात अपयशी ठरला. मात्र त्याने दुसऱ्या डावात आपला इंगा दाखवला. अर्शीनने सर्व्हिस विरुद्ध अर्धशतक झळकावलं. महाराष्ट्र टीम अडचणीत असताना अर्शीनने हे पहिलवहिलं अर्धशतक झळकावत डाव सावरला. अर्शीनकडून शतकाची अपेक्षा होती. मात्र त्याआधीच तो आऊट झाला. अर्शीनने 147 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 58 धावांची झुंजार खेळी केली. अर्शीनचा या दरम्यान 39.46 इतका स्ट्राईक रेट राहिला. तर पहिल्या डावात अर्शीनला 2 धावाच करता आल्या.
Welcome to the team! Three debutants make their mark in today’s Ranji match against Services in Delhi. Congratulations to all on this memorable milestone!#RanjiTrophy2024 #bccidomestic #MaharashtraCricket #debutants #MaharashtraVsServices #delhi pic.twitter.com/Jm8bdrGiFv
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) February 16, 2024
दरम्यान सर्व्हिस विरुद्धच्या या सामन्यातून महाराष्ट्रकडून 3 खेळाडूंनी पदार्पण केलं. यामध्ये अर्शीन कुलकर्णी याच्या व्यतिरिक्त अंडर 19 स्टार बीडचा वाघ सचिन धस आणि अनुराग कवडे या दोघांचा समावेश आहे. सचिन धस पहिल्या डावात अपयशी ठरला. सचिनने 19 धावा केल्या. त्यामुळे त्याच्याकडून दुसऱ्या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
महाराष्ट्र प्लेईंग ईलेव्हन | अंकित बावणे (कर्णधार), अर्शीन कुलवकर्णी, मुर्तझा ट्रंकवाला, ऋतुराज गायकवाड, कौशल तांबे (विकेटकीपर), दिग्विजय पाटील, तरनजीत सिंग ढिल्लोन, प्रदीप दधे, सचिन धस, अनुराग कवडे आणि हितेश वाळुंज.
सर्व्हिस प्लेईंग ईलेव्हन | रजत पालीवाल (कॅप्टन), शुभम रोहिल्ला, रवी चौहान, नकुल शर्मा, एलएस कुमार (विकेटकीपर), पुलकित नारंग, अर्जुन शर्मा, पूनम पुनिया, वरुण चौधरी, नितीन तन्वर आणि विनीत धनखर.