Mahendra Singh Dhoni : ‘धोनी संघात आलेला तव्हा माझ्या पत्नीला बोललेला की…’; दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा खुलासा

| Updated on: Jul 07, 2023 | 7:23 PM

धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याचे अनेक किस्से समोर येत आहेत. त्यातील एक म्हणजे धोनीने एका क्रिकेटपटूच्या पत्नीला मोठी गोष्ट बोलला होता. आता त्या क्रिकेटपटूनेच याबाबत सांगितलं आहे. 

Mahendra Singh Dhoni : धोनी संघात आलेला तव्हा माझ्या पत्नीला बोललेला की...; दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा खुलासा
MS dhoni
Follow us on

मुंबई : टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र सिंह धोनीचा आज शुक्रवारी 42 वा वाढदिवस आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारताने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. एकदिवसीय वर्ल्ड कप 2011, टी-20 वर्ल्ड कप 2007 आणि चॅम्पियन ट्रॉफी 2013  आयसीसीच्या या तिन्ही ट्रॉफी त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली मिळवून दिल्या आहेत. धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याचे अनेक किस्से समोर येत आहेत. त्यातील एक म्हणजे धोनीने एका क्रिकेटपटूच्या पत्नीला मोठी गोष्ट बोलला होता. आता त्या क्रिकेटपटूनेच याबाबत सांगितलं आहे.

2004 साली धोनीने पदार्पण केलं होतं त्यानंतर संघात त्याने आपलं कायम केलं होतं. 2005 साली इंग्लंड साली वसीम जाफर या क्रिकेटपटूने कमबॅक करत संघात जागा मिळवली होती. त्यावेळी वसीम जाफर, दिनेश कार्तिक आणि धोनी शेवटच्या सीटवर बसायचे. तेव्हा कार्तिक आणि वसीम जाफरची पत्नी सोबत होत्या. धोनी वसीम जाफरच्या पत्नीसोबत खूप गप्पा मारत असल्याचं जाफरने सांगितलं.

काय म्हणाला वसीम जाफर?

धोनी माझ्या पत्नीला नेहमी म्हणायचा की 30 लाख रुपये कमावण्याचे आहेत. म्हणजे राहिलेलं आयुष्य रणजीमध्ये आरामात घालवता येईल. धोनीची रांची सोडायची इच्छा नव्हती, काहीही झालं तरी मी रांची सोडणार धोनी म्हणत असल्याचं वसीम जाफरने सांगितलं.

भाभी, मला 30 लाख रूपये कमवायचे आहेत, शांततेत आणि आरामात जगण्यासाठी तेवढे पैसे मला पुरेसे असल्याचं धोनी माझ्या पत्नीला म्हणाल्याचं वसीम जाफरने सांगितलं. धोनी आता इतका मोठा झाला असला तरी तो अजुनही नम्र आहे त्याची ही गोष्ट आपल्याला आवडत असल्याचंही वसीम जाफर म्हणाला.

दरम्यान धोनी आता 42 वर्षांचा झाला असून टीम इंडियाचा क्रिकेटचा इतिहास पाहिला तर त्याचं नाव  कायम नोंदवलं गेलं आहे. धोनीने अनेक अटीतटीचे सामने जिंकून देत त्याच्या नेतृत्त्वामध्ये काहीतरी खास असल्याचं दाखवून दिलं आहे.