Mahendra Singh Dhoni : ओ दिन भी क्या दिन थे | सुरेश रैनाने धोनीला शुभेच्छा देताना शेअर केला खास व्हिडीओ

| Updated on: Jul 07, 2023 | 6:35 PM

महेंद्र सिंह धोनीचा हुकमी एक्का असलेला खेळाडू सुरेश रैना याने माहीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश रैनाने धोनीसोबतचे फोटो असलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mahendra Singh Dhoni : ओ दिन भी क्या दिन थे | सुरेश रैनाने धोनीला शुभेच्छा देताना शेअर केला खास व्हिडीओ
Follow us on

मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताच्या मनावर राज्य करणाऱ्या टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी याचा आज 42 वा वाढदिवस आहे. (Mahendra Singh Dhoni) महेंद्र सिंह धोनीने मैदानावरील आपल्या बॅटींग, कीपिंग आणि कॅप्टन्सीने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. सचिन तेंडुलकरशिवाय क्रिकेट पूर्ण होत नाही. तशाच प्रकारे धोनीसुद्धा या यादीमध्ये आता मोडला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतल्यावरही आयपीएलमध्ये धोनीची क्रेझ पाहायला मिळते. धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

महेंद्र सिंह धोनीचा हुकमी एक्का असलेला खेळाडू सुरेश रैना याने माहीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश रैनाने धोनीसोबतचे फोटो असलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये, मोठ्या भावासारखा असलेल्या माहिला शुभेच्छा, खेळपट्टीपासून ते  स्वप्न पूर्ण होण्यापर्यंत आपल्यामध्ये अतूट नातं तयार झालेलं आहे. एक लीडर आणि मित्र म्हणून तु माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचं सुरेश रैनाने म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

दरम्यान, सुरेश रैना कायम धोनीचा खास खेळाडू राहिला आहे. धोनी आणि रैनाची मैत्री क्रिकेट जगताला माहित आहे. महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती घेतली होती. त्याच दिवशी सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली होती. सीएसकेसाठी धोनी अजुनही खेळत आहे मात्र रेनाने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे. यंदाच्या मोसमात रैना समालोचकाच्या भूमिकेत दिसला होता. रैनानेही चोखपणे आपली भूमिका बजावली.