IPL : महेंद्रसिंह धोनी आणखी पाच वर्षे आयपीएल खेळणार, हा नियम पडणार पथ्यावर! कसं ते वाचा

| Updated on: May 20, 2023 | 2:43 PM

महेंद्रसिंह धोनी 41 वर्षांचा असून आयपीएलमधील सर्वात वयस्कर कर्णधार आहे. आयपीएल कार्यकाळात चेन्नईला चारवेळा जेतेपद जिंकून दिलं आहे. पण महेंद्रसिंह धोनी रिटायर होणार अशा वावड्या उठल्या असताना युसूफ पठाणने आयपीएलच्या एका नियमाचा संदर्भ दिला आहे.

IPL : महेंद्रसिंह धोनी आणखी पाच वर्षे आयपीएल खेळणार, हा नियम पडणार पथ्यावर! कसं ते वाचा
IPL : महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये आणखी काही वर्षे खेळणार, एक नियम फायद्याचा ठरणार; कसं ते समजून घ्या
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नावाची जोरदार चर्चा आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने चांगली कामगिरी केली आहे. चार वेळा जेतेपदावर नावर कोरलं आहे. त्याचबरोबर यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल अशीच शक्यता आहे. दरम्यान महेंद्रसिंह धोनीचा ही आयपीएल स्पर्धा शेवटची असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. पण माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणने सांगितलं की, महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्ससाठी आणखी पाच वर्षे आयपीएल खेळू शकतो. आयपीएल नव्या नियमाचा त्याने यासाठी संदर्भ दिला.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यापूर्वी ईएसपीएनक्रिकइन्फो वर युसूफ पठाणने याबाबत स्पष्टपणे सांगितलं की, “महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्ससाठी आणखी पाच वर्षे क्रिकेट खेळू शकतो. आयपीएल इम्पॅक्ट प्लेयर हा नियम आहे. तर धोनी आरामात 5 वर्षे आणखी क्रिकेट खेळू शकतो. त्यात कोणतीच अडचण येणार नाही.”

“पुढच्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी भले कर्णधार नसेल. पण इम्पॅक्ट प्लेयर म्हमून आरामात खेळू शकतो. या पद्धतीने तो चेन्नईसाठी मेंटॉरची भूमिकाही बजावू शकतो. म्हणून तो निवृत्त होईल असा विचार अजिबात करू नका. त्याच्याकडे अजून खूप क्रिकेट आहे. दुखापतीनंतरही तो लांब षटकार ठोकू शकतो, हे आपण पाहिलं आहे.”, असंही युसूफ पठाणने सांगितलं.

महेंद्रसिंह धोनीचा कार्यकाळ

2008 ते 2015 या काळात धोनी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. चेन्नई संघावर दोन वर्षांची बंदी लागल्याने 2016 ते 2017 या दोन पर्वात रायझिंग पुणे सुपरजायन्ट संघाकडून खेळला. त्यानंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या हाती आली. महेंद्र सिंह धोनीचं हे 16 वं पर्व आहे. त्यात धोनीचं वय 41 वर्षे असून 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.त्यानंतर आतापर्यंत धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे.

चेन्नईचा संपूर्ण स्क्वॉड

चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.