M S Dhoni | झिवा होणार मोठी बहीण, धोनीच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हळणार? व्हिडीओ होतोय व्हायरल

| Updated on: Apr 24, 2023 | 8:56 PM

धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याचं सर्वांना वाटत आहे. कारण स्वत: धोनीनेही अनेकवेळा, मी शेवटच्या फेसमध्ये असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे चाहतेही धोनीला शेवटचं का होईना पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

M S Dhoni | झिवा होणार मोठी बहीण, धोनीच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हळणार? व्हिडीओ होतोय व्हायरल
Follow us on

मुंबई : आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने सर्वांना वेड लावलं आहे. सीएसके संघ ज्या ठिकाणी खेळायला जात आहे त्या ठिकाणी चेन्नईचं होम ग्राऊंडअसल्यासारखा त्यांना चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याचं सर्वांना वाटत आहे. कारण स्वत: धोनीनेही अनेकवेळा, मी शेवटच्या फेसमध्ये असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे चाहतेही धोनीला शेवटचं का होईना पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर धोनी पुन्हा एकदा वडील बनणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

साक्षी धोनी खरच प्रेग्नंट आहे का?

आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांच्या ईदच्या पार्टीमध्ये धोनीची पत्नी आणि कन्या साक्षी, झिवा यांनी हजेरी लावली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी, साक्षी धोनीने तिच्या दुपट्ट्याने आपले पोट ज्या प्रकारे लपवले त्यावरून सोशल मीडियावर नेटकरी साक्षी धोनी प्रेग्नंट असल्याचाअंदाज लावत आहेत. सोशल मीडियावरील चाहत्यांच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांमध्येच समोर येईल.

पाहा व्हिडीओ

 

आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. रविवारी चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. सध्या चेन्नई सुपर किंग्जचे 10 गुण आहेत.

एमएस धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, आकाश सिंग, मथीशा पथिराना, सिमारेषा सोनिया, आकाश सिंग, महेश तीक्ष्णा, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, अजय मंडल, भगत वर्मा, सिसांडा मगला