IPL 2023 : ‘या’ फोटोमध्ये धोनी आणि विराटची पत्नी ओळखून दाखवा, दोघींचं बेंच कनेक्शन समोर!

| Updated on: May 30, 2023 | 11:24 PM

Anushka Shama and Sakshi Dhoni : अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी यांच्याबाबतची एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी बहुतेक लोकांना माहिती नसेल.

IPL 2023 : या फोटोमध्ये धोनी आणि विराटची पत्नी ओळखून दाखवा, दोघींचं बेंच कनेक्शन समोर!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रसिद्ध अभिनेत्री एक आहे. तिनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तिचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. तसंच अनुष्का सोबतच महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी ही देखील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तर अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी यांच्याबाबतची एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी बहुतेक लोकांना माहिती नसेल.

अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी या एकाच शाळेत एकत्र शिकत होत्या. विशेष सांगायचं झालं तर या दोघींनी विचारही केला नव्हता की त्यांचं लग्न प्रसिद्ध क्रिकेटर्सशी होईल. साक्षी आणि अनुष्का एका शाळेत शिकत होत्या मात्र, त्या दोघी एकमेकींना ओळखत नव्हत्या. या दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्या गप्पा मारत असताना शाळेच्या दिवसाबाबत बोलताना त्यांना समजलं की त्या दोघी एका शाळेत शिकत होत्या.

 

अनुष्काचे वडील हे कर्नल होते त्यामुळे त्यांची पोस्टिंग नेहमी बदलत होती. एक वेळ त्यांची पोस्टिंग आसाम मध्ये झाली त्यामुळे अनुष्का आसाम मधील सेंट मेरी या शाळेत शिकत होती. याच शाळेत साक्षी देखील शिकत होती. सध्या या दोघांचे शाळेतील लहानपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत साक्षी परीच्या रूपात दिसत आहे तर अनुष्का शर्मा तिची फेवरेट अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखं दिसण्यासाठी तिच्यासारखा सेम घागरा घातलेला दिसत आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुष्का अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबई गेली आणि आज ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर साक्षी धोनीने शिक्षणानंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. तसंच साक्षीची धोनी सोबत पहिली भेट कोलकत्यातील एका हॉटेलमध्ये झाली होती, त्यावेळी तिथे साक्षी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. त्या दोघांची झालेली भेट म्हणजे एक योगायोग होता. तर अनुष्का शर्मा एका ऍड शूट मध्ये विराट कोहलीला भेटली होती त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.