Mumbai Indians : मुंबई इंडियन्स संघात राशिद खान, कगिसो रबाडा तर कर्णधारपदी पोलार्डची निवड

| Updated on: Jun 15, 2023 | 5:46 PM

MCL : मुंबई इंडिअन्स संघाचा हुकमी खेळाडू किरन पोलार्ड नवी इनिंग सुरू करत आहे. किरन पोलार्डसह आयपीएल  गाजणारे हुकमी खेळाडी राशिद खान, कगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, टीम डेव्हिडसह अनेक मॅचविनरचाही समावेश आहे.

Mumbai Indians : मुंबई इंडियन्स संघात राशिद खान, कगिसो रबाडा तर कर्णधारपदी पोलार्डची निवड
Follow us on

मुंबई : आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी असलेला मुंबई इंडियन्स संघाचा हुकमी खेळाडू किरन पोलार्ड नवी इनिंग सुरू करत आहे. किरन पोलार्डसह आयपीएल गाजणारे हुकमी खेळाडू राशिद खान, कगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, टीम डेव्हिड अनेक मॅचविनरचाही समावेश आहे. अमेरिकेत 13 जुलैपासून सुरू होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमधी MI न्यूयॉर्क फ्रँचायझीने आपल्या परदेशी खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

MI न्यूयॉर्कमध्ये आणखी 8 परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ट्रेंट बोल्ट, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, निकोलस पूरन, राशीद खान, डेव्हिड विज, कागिसो रबाडा आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांच्या नावांचा समावेश आहे. यामधील अनेक खेळाडू मुंबईसाठी आयपीएलकडून खेळले आहेत.

मुंबईचा हुकमी खेळाडू असलेल्या पोलार्डकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलार्डने मागील वर्षी आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती त्यानंतर त्याला मुंबई संघाच्या बॅटींग कोचची जबाबदारी दिली आहे. इतर खेळाडूंमधील टीम डेव्हिड  आणि जेसन बेहरेनडॉर्फ हे मुंबईकडून आता झालेल्या सीझनमध्ये खेळताना दिसले होते.

राशिद आणि रबाडासाठी MI फ्रँचायझी अंतर्गत हा दुसरा संघ असेल. या दोघांनी यापूर्वी SA20 मध्ये MI केपटाऊनचे प्रतिनिधित्व केले होते. पूरन आणि बोल्ट हेही यापूर्वी UAE मध्ये ILT20 स्पर्धेत MI Emirates कडून खेळले होते. डेव्हिड आणि ब्रेव्हिससाठी, ही तिसरी (IPL आणि SA20 व्यतिरिक्त) MI फ्रँचायझी आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू रॉबिन पीटरसनची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. जे अरुणकुमार आणि जेम्स पॅमेंट हे अनुक्रमे बॅटींग आणि फिल्डिंग कोच आहेत.