मुंबई : मेजर क्रिकेट लीगमधील दुसरी क्वालिफायर दोन मोठ्या संघांमध्ये झालेली पाहायला मिळाली. MI न्यूयॉर्क आणि टेक्सास सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यामध्ये मुंबई संघाने धमाकेदार विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. मुंबईने सुपर किंग्ज संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. स्टार खेळाडू ट्रेंट बोल्टने ४ विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या टेक्सास सुपर किंग्ज संघाचा डाव १५८ धावांवर आटोपला होता. डेव्हॉन कॉनवे ३८ धावा आणि मिलिंद कुमार ३७ धावा यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिसलाही खास काही करता आलं नाही. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ विकेटस् आणि टीम डेव्हिडने २ विकेट्स घेतल्या.
या आव्हानाचा पाठलागर करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई संघाची सुरूवात फार काही चांगली झाली नाही. शायन जहांगीर ३६ धावा, निकोलस पूरन २३ धावा, टिम डेव्हिड ३३ धावा, डेवाल्ड ब्रेविस नाबाद ४१ धावा आणि डेव्हिड विसे नाबाद १९ धावा यांच्या बॅठींगच्या जोरावर मुंबईने सहज हा सामना जिंकला. यामधील टीम डेव्हिडने २० चेंडूत सलग ४ सिक्सर्सच्या मदतीने ३३ धावा केल्या.
मुंबईने हा सामना जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला असून मुंबई आणि सिएटल ऑर्काससोबत अंतिम सामना होणार आहे. डेवाल्ड ब्रेविसनेही आक्रमक खेळी करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली.
MI न्यूयॉर्क (प्लेइंग इलेव्हन): शायन जहांगीर, डेवाल्ड ब्रेविस, स्लेड व्हॅन स्टेडन, टिम डेव्हिड, निकोलस पूरन (w/c), डेव्हिड विसे, स्टीव्हन टेलर, रशीद खान, नॉथुश केन्जिगे, ट्रेंट बोल्ट, एहसान आदिल
टेक्सास सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे (W), फाफ डू प्लेसिस (C), कोडी चेट्टी, मिलिंद कुमार, डेव्हिड मिलर, डॅनियल सॅम्स, मिचेल सॅंटनर, केल्विन सेवेज, मोहम्मद मोहसिन, जेराल्ड कोएत्झी, रस्टी थेरॉन