मुंबई : टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलीये. या खेळाडूने निवृत्ती जाहीर करताना टीम इंडियाचा माजी आणि सर्वात यशस्वी ठरलेला कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्यावर गंभीर आरोप केलेत. धोनीने आपल्याला संघात स्थान दिलं नाही. मीपण आज विराट कोहली आणि रोहित शर्मसारखा तगडा खेळाडू असतो, असं म्हणत या खेळाडूने धोनीवर निशाणा साधला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीनंतरही त्याला संघात जागा मिळाली नाही. कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मनोज तिवारी आहे. मनोज तिवारी याने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने धोनीवर गंभीर आरोप केला आहे. कोलकातामधील स्पोर्ट्स जर्नलिस्ट क्लबमध्ये सत्कार समारंभावेळी त्याने पत्रकारांशी संवाद साधताना हा सवाल केला आहे.
मनोज तिवारी याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध नाबाद 104 धावांची दमदार खेळी केली होती. 12 वन डे सामन्यांमध्ये मनोज तिवारी याने 287 धावा केल्या होत्या. माझ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंप्रमाणे प्रतिभा होती. माझ्यात हिरो बनण्याची तेवढी क्षमता होती. आज जेव्हा तरूण खेळाडूंना संधी दिली जाते तेव्हा मला दु:ख होत असल्याचं मनोज तिवारी याने म्हटलं आहे.
वरूण अॅरोन, सौरभ तिवारी फैज फजल, धवल कुलकर्णी यांनीही निवृत्तीची घोषणा केली आहे. मनोज तिवारी हा पाचवा खेळाडू आहे ज्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. याआधीही मनोज कुमार याने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र त्याने परत एकदा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता परत एकदा मनोजने क्रिकेटला अलविद म्हटलं आहे.